Cricket player foreign league saam tv
Sports

Cricket News: टीम इंडियातून वगळलं, आता थेट देश सोडत दुसऱ्या टीममधून खेळणार भारताचा 'हा' खेळाडू

Cricket player foreign league: टीम इंडियाच्या या खेळाडूला अलीकडेच बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आलं होतं. मात्र त्याने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून चांगली कामगिरी केली आहे. आता त्याच्याबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज इशान किशन बऱ्याच काळात टीमबाहेर आहे. २०२३ पासून त्याला कोणत्याही इंटरनॅशनल फॉर्मेटमध्ये स्थान मिळालेलं नाही. नुकतंच त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी इंडिया-अ संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत आता या तरुण क्रिकेटरने एक मोठा निर्णय घेतलाय. इशान आता विदेशी देशाच्या एका टीमकडून खेळणार आहे.

इशान किशनने काउंटी चॅम्पियनशिपच्या दोन सामन्यांसाठी नॉटिंगहॅमशायर क्रिकेट क्लबसोबत करार केला आहे. तो इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डेब्यू करण्यास सज्ज आहे.

नॉटिंगहॅमशायर क्रिकेट क्लबने शुक्रवारी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे इशान किशनच्या त्यांच्या टीममध्ये सामील झाल्याची माहिती आहे. क्लबने लिहिले की, 'ट्रेंट ब्रिजमध्ये आपले स्वागत आहे, इशान किशन.' क्लबने माहिती दिलीये की, भारतीय विकेटकीपर फलंदाजाने दोन सामन्यांसाठी टीमसोबत करार केलाय.

डेब्यूसाठी तयार इशान किशन

नॉटिंगहॅमशायर वेबसाइटनुसार, इशान म्हटलंय की, "इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याची पहिली संधी मिळाल्याबद्दल मी खूप उत्साहित आहे. माझं कौशल्य दाखवण्याची ही एक उत्तम संधी असणार आहे. मला एक चांगला क्रिकेटपटू बनण्याची इच्छा आहे. तिथल्या परिस्थितीत खेळल्याने माझे कौशल्य खरोखरच सुधारणार आहे. ट्रेंट ब्रिज हे एक प्रसिद्ध मैदान असून मी तिथे खेळण्यास उत्सुक आहे."

टीमचे मुख्य प्रशिक्षक पीटर मूर्स यांनी सांगितलं की, 'पुढील दोन चॅम्पियनशिप सामन्यांसाठी ईशानची सेवा मिळाल्याने आम्हाला आनंद होतोय. ईशान काउंटी क्रिकेटमध्ये सामील होण्यास खूप उत्सुक आहे. तो एक हार्ड-हिटिंग मिडल ऑर्डरचा फलंदाज आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT