Ishan Kishan Video X
Sports

Ishan Kishan : इथं दिसना तिथं दिसना... फिल्डिंग करताना इशान किशनची उडाली तारांबळ, बॉल शोधताना झाला गोंधळ

Ishan Kishan Video : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यादरम्यान इशान किशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इशानचा फिल्डिंग करतानाचा झालेला गोंधळ पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

SRH VS PBKS राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद विरुद पंजाब किंग्स हा सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला पंजाबच्या खेळाडूंनी आक्रमक फलंदाजी केली. सलामीवीर माघारी परतल्यानंतर हैदराबादने सामन्यात काही प्रमाणात कमबॅक केले.

हैदराबाद विरुद्ध पंजाब या सामन्यादरम्यान हैदराबादकडून खेळणाऱ्या इशान किशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. फिल्डिंग करत असताना इशान किशनसोबत गमतीशीर किस्सा घडला. स्टेडियमच्या जमिनीवरील जाहिरातींमुळे इशानला बॉल दिसला नाही. काही सेकंद तो बॉल इकडे-तिकडे शोधत होता. ही घटना स्टेडियमवरच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.

नेमकं काय घडलं?

मोहम्मद शमीच्या पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर प्रभसिमरन सिंगने समोरच्या बाजूला शॉट मारला. इशान किशनने धावत जाऊन सीमारेषेजवळ जाणारा बॉल अडवला. पण मैदानावरील जाहिरातीतील पांढऱ्या रंगामुळे तो पांढरा बॉल दिसेनासा झाला. इशान इकडे-तिकडे बॉल शोधत होता. तेवढ्यात कर्णधार पॅट कमिन्स आला आणि कमिन्सचे बॉल पुन्हा शमीकडे फेकला.

सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग ११ -

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -

प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मार्को जॅन्सन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT