सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरु असून टीम इंडियाने एडलेडमध्ये झालेला सामना गमावला. दुसऱ्या टेस्ट सामन्यात झालेल्या पराभवामुळे सिरीजमध्ये १-१ अशी बरोबरी झाली आहे. दरम्यान अशातच टीम इंडियाच्या मॅनेजमेटला गोलंदाजी डिपार्टमेंटबाबत चिंता सतावतेय.
एडलेडमध्ये झालेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहने एका बाजूने दडपण निर्माण केलं होतं. मात्र दुसरीकडे हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज कांगारूंवर दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरले. अशातच एक बातमी समोर आली ती म्हणजे या परिस्थितीत मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या बातमीनंतर असून सर्वांच्या नजरा त्याच्या फिटनेसकडे लागल्या आहेत. आता एक नवीन रिपोर्ट आला असून रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये काही आलबेल नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
मोहम्मद शमीने काही काळापूर्वी तो पूर्णपणे फिट असल्याचा दावा केला होता. पण त्याचवेळी रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार, शमी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी 100 टक्के फिट नाही. आता रोहितच्या वक्तव्यामुळे दोघांमध्ये संबंध चांगले नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
दैनिक जागरणचा हवाला देत एका सूत्राने सांगितलं की, कर्णधार रोहित आणि शमी बेंगळुरूमध्ये भेटलं होते. मात्र त्यावेळी त्यांच्यामध्ये काही वाद झाला होता.
या रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, ज्यावेळी शमी नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये होता, त्यावेळी बंगळूरूमध्ये झालेल्या टेस्टपूर्वी त्याची रोहित शर्माशी भेट झाली होती. त्यावेळी कर्णधाराने दिलेल्या विधानावरून दोघांमध्ये वाद झाला होता, ज्यामध्ये रोहितने शमी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचं म्हटलं होतं.
एडलेड टेस्ट संपल्यानंतर रोहित म्हणाला होता की, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मध्ये शमीच्या कमबॅकसाठी दरवाजे खुले आहेत. मात्र यावेळी टीम मॅनेजमेंट परंतु टीम मॅनेजमेंट त्याच्या कमबॅकसाठी घाई करू इच्छित नाही. त्याचप्रमाणे रोहितने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं की, टीम मॅनेजमेंटचे फिटनेसवर लक्ष ठेवून आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.