ipl trophy  Twitter
क्रीडा

IPL Ticket: पॉपकॉर्न पेक्षाही कमी आहेत IPL च्या तिकीटांचे दर! पाहा कुठे आणि कसं बुक करायचं..

Ankush Dhavre

IPL Ticket price: आयपीएल २०२३ स्पर्धेला येत्या ३१ मार्चपासून सुरूवात होणार आहे. तर अंतिम सामना २ जून पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी कसून सराव करायला देखील सुरूवात केली आहे.

यावर्षी आयपीएल स्पर्धेतील सामने देसभरात खेळवले जाणार आहेत. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयपीएलच्या तिकीटांच्या किमतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Latest sports updates)

ही स्पर्धा ५२ दिवस चालणार आहे. यादरम्यान एकूण ७० सामने खेळवले जाणार आहेत. या हंगामतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.

हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यासाठी तिकीटांचे दर ८०० रुपयांपासून ते ४५०० रुपयांपर्यंत असणार आहेत. हे तिकीट तुम्ही पेटीएम इंसाइडरवर बुक करु शकतात.

फ्रीमध्ये इथे पाहू शकता सामना..

गतवर्षीपर्यंत आयपीएल स्पर्धेचे मीडिया राईट्स स्टारकडे होते. त्यामुळे सामना टीव्हीवर आणि ऑनलाईन पाहण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागत होते. मात्र यावेळी तुम्ही हे सामने फ्रीमध्ये पाहू शकता.

आयपीएल २०२३ स्पर्धेचे मीडिया राईट्स वायकॉम १८ कडे आहेत. त्यामुळे हे सामने वूट आणि जिओ सिनेमावर फ्रीमध्ये पाहता येणार आहेत. यात मुख्य बाब म्हणजे जिओ सिनेमावर तुम्ही ११ भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेऊ शकता. ज्यात इंग्रजी, मराठी आणि हिंदीसह भोजपुरी,बंगाली भाषेचा देखील समावेश आहे.

असे आहेत तिकीटांचे दर..

८०० रूपये

१००० रूपये

१५०० रूपये

२००० रूपये

४५०० रूपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT