IPL च्या वेळापत्राकाची आज घोषणा होण्याची शक्यता Twitter/ @IPL
क्रीडा

IPL च्या वेळापत्रकाची आज घोषणा होण्याची शक्यता

आयपीएल 2021 हंगामाचा उर्वरित भाग 19 सप्टेंबरपासून युएईच्या भूमीवर सुरू होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळला जाईल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 14 व्या हंगामातील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक आज जाहिर होऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार लवकरच आयपीएल 2021 (IPL 2021) च्या उर्वरित हंगामाचे अधिकृत वेळापत्रक समोर येऊ शकते. त्याची क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा होती. आयपीएलचे उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये म्हणजेच युएईमध्ये खेळवले जाणार आहेत.

आयपीएल 2021 हंगामाचा उर्वरित भाग 19 सप्टेंबरपासून युएईच्या (UAE) भूमीवर सुरू होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळला जाईल. आयसीसी टी -20 विश्वचषक 2021 (ICC T-20 World Cup) पूर्वी ही स्पर्धा सर्व खेळाडूंसाठी महत्त्वाची आहे. कारण टी -20 वर्ल्ड कप युएईतील अबू धाबी, दुबई आणि शारजाहच्या मैदानावर होणार आहे. अशा परिस्थितीत तेथील परिस्थितीशी परिचित होण्यासाठी आयपीएल ही एक चांगली स्पर्धा आहे.

आयपीएल 2021 चे आयोजन भारतात केले जात होते. सुरवातीस सर्व काही ठीक झाले. परंतु संघ एका शहरातून दुसर्‍या शहरात येताच खेळाडुंना कोरोना विषाणूची लागण झाली. काही रुग्ण समोर आल्यानंतर बीसीसीआयने ही स्पर्धा पुढे ढकलली. आयपीएलच्या 14 व्या सत्राचा शेवटचा सामना 2 मे रोजी खेळला गेला. यानंतर कोरोनामुळे सलग दोन सामने शेड्यूल केले गेले, परंतु स्पर्धा सुरू होऊ शकली नाही.

आयपीएलचा शेवटचा हंगाम युएईमध्ये खेळला गेला होता आणि स्पर्धेच्या सुरूवातीला काही कोरोना रुग्ण समोर आले होते. परंतु, काही काळानंतर अनेक खेळाडुंना कोरोनाची लागण झाली. यामुळेच बीसीसीआयने आयपीएल 2021 ला युएईमध्ये हलविले आहे. यामागील एक कारण म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये देशात पाऊस पडतो. अशा परिस्थितीत या काळात वेगवेगळ्या शहरात आयपीएलचे आयोजन करता येणार नाही.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT