SA vs WI: दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव

दुसरीकडे वेस्ट इंडिजकडून ओबेड मैकॉयने 3 बळी घेतले, तर केव्हिन सिन्क्लेअरने 2 आणि जेसन होल्डर आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक गडी बाद केला.
SA vs WI: दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव
SA vs WI: दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव Twitter/ @ICC
Published On

यजमान वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका (SAvsWI) यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. यासह ही टी -20 मालिका आता बरोबरीत आहे. पहिला सामना वेस्ट इंडीजने अतिशय आरामात जिंकला होता, परंतु दुसर्‍या सामन्यात कॅरेबियन संघाला हार पत्कारावी लागली आहे.

या सामन्यातही वेस्ट इंडीजचा कर्णधार किरॉन पोलार्डने (Kieron Pollard) नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पुन्हा दक्षिण आफ्रिकेला 166 धावांवर रोखले. आफ्रिका संघाने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 166 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार टेंबा बावुमाने सर्वाधिक 46 धावा केल्या. त्याने 33 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 46 धावा केल्या. सलामीवीर रीझा हेंड्रिक्सनेही 42 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 26 धावांची खेळी केली.

दुसरीकडे वेस्ट इंडिजकडून ओबेड मैकॉयने 3 बळी घेतले, तर केव्हिन सिन्क्लेअरने 2 आणि जेसन होल्डर आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याच वेळी, 167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज संघाला चांगली सुरुवात मिळाली, पण त्यानंतर विकेट पडण्यास सुरुवात झाली, जे पराभवाचे कारण बनले. या सामन्यात वेस्ट इंडीजच्या कोणताही खेळाडूला आपली जादू दाखवता आली नाही आणि वेस्ट इंडिज संघाने सामना 16 धावांनी गमावला.

SA vs WI: दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव
मुंबई- गोवा महामार्गावर टॅंकरमधून केमिकल गळती !

मागच्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने 161 धावांचे लक्ष 15 षटकात गाठले होते. परंतु दुसर्‍या सामन्यात ती कोसळली. दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांच्या 9 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करू शकला होता. कॅरेबियन संघासाठी आंद्रे फ्लेचरने सर्वाधिक 35 धावा केल्या पण त्याने 36 चेंडूंचा सामना केला. फॅबियन अॅलनने 12 चेंडूत 34 धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com