दिनेश पिसाट
रायगड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर Mumbai-Goa National Highway नडगाव Nadgaon गावच्या हद्दीत महाड एम आय डि सी MIDC मधिल सरस्वती केमिकल्स या कंपनीचा टेंकर एम आय डि सी मधून सल्फ्युरिक ॲसिड Sulphuric Acid घेऊन जात होता. यावेळेस या टँकरच्या मागली बाजुस पाईपला छिद्र पडले. यामुळे या छिद्रातून केमिकल Chemical गळती झाली आहे. हे केमिकल वाहून बाजूला असलेल्या शेतात गेल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. Chemical leak from tanker on Mumbai-Goa highway
पाईप लीक झाल्यामुळे टँकर मधिल सल्फ्युरिक ॲसिड रस्त्यावर वाह्यायला सुरवात झाली. लालसर रंगाचे केमिकल्स रस्त्यावर पडल्याने आणि ॲसिडचा पाण्याशी संपर्क आल्याने धुर आणि पाण्यातुन वाफा येत होत्या. सदर प्रकार महाड एम आय डि सी पोलिसांना कळविण्यात आला. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन सदर टँकर रस्त्याच्या बाजुला घेतला आहे.
हे देखील पहा-
महाड Mahad एम आय डी सी मधिल मार्क टिमला या घटनेबाबत कळविण्यात आले. मात्र तो पर्यंत मोठ्या प्रमाणात केमिकल्स लिक होऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात जाऊन मिसळले होते. भातलावणीत केमिकल्स शेतात गेल्याने शेतकरी अक्रमक झाले होते. आमच्या हता तोंडाशी आलेला घास या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे जातो कि काय आशी भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
घटना स्थळी मार्क टिमचे कर्मचारी प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित राहिल्याने सदर टँकरची गळती थांबवण्यात यश आले आहे. मात्र अचानक झालेल्या केमिकल गळती मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.