mumbai indians twitter
Sports

IPL Mega Auctions: आयपीएल लिलावात मोडले जाणार सर्व रेकॉर्ड! या 3 खेळाडूंवर लागू शकते रेकॉर्डब्रेक बोली

IPL 2025 Auctions: आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मेगा ऑक्शनचा थरार रंगणार आहे. दरम्यान या लिलावात अनेक स्टार खेळाडूंवर बोली लागणार आहे. या ३ खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेत मोठे बदल पाहायला मिळू शकतात. या स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावात रिटेन केलेल्या खेळाडूंना वगळता इतर सर्व खेळाडूंना रिलीज केलं जाणार आहे.

त्यामुळे उर्वरित सर्व खेळाडू लिलावाच्या रिंगणात असणार आहेत. दरम्यान काही भारतीय खेळाडू असे आहेत, जे या लिलावात महागडे ठरू शकतात. फ्रेंचायझी या खेळाडूंवर मोठी बोली लावू शकतात. कोण आहेत ते खेळाडू? जाणून घ्या.

माध्यमातील वृत्तात असं म्हटलं जात आहे की, रोहित शर्मा आणि केएल राहुलसारखे स्टार खेळाडू आपल्या संघाची साथ सोडू शकतात. असे झाल्यास हे खेळाडू देखील लिलावाच्या रिंगणात दिसतील.

केएल राहुल

केएल राहुलकडे लखनऊ सुपर जायंट्स संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. त्याने या संघाचं नेतृत्व करताना आपल्या संघाला सलग २ वेळेस प्लेऑफमध्ये पोहोचवलं होतं. आयपीएल २०२४ स्पर्धेतही या संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी होती.

मात्र शेवटी या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्स संघ त्याला रिटेन करण्याची शक्यता खूप कमी असणार आहे. जर त्याला रिलीज केलं आणि तो लिलावात आला तर नक्कीच तो महागडा खेळाडू ठरू शकतो.

रोहित शर्मा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने ५ वेळेस आयपीएलची ट्रॉफी उंचावली. मात्र गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर फलंदाज म्हणूनही त्याने चांगली कामगिरी केली. त्याने १४ सामन्यांमध्ये ४१७ धावा केल्या. मात्र माध्यमातील वृत्तात असा दावा केला जात आहे की,रोहित शर्मा आगामी हंगामात मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडू शकतो.

हर्षित राणा

हर्षित राणाने कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल २०२४ स्पर्धेचं जेतेपद जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने या संघाकडून खेळताना १९ गडी बाद केले होते. यासह फायनलमध्येही त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे तो जर लिलावात आला, तर नक्कीच त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Bhaubeej Gift: अजून ठरलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? पाहा भाऊबीजासाठी खास आणि ट्रेंडी गिफ्ट Ideas

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT