शुभम दुबेला राजस्थान रॉयल्सने ८० लाख मोजत आपल्या संघात घेतलं आहे.
मुंबई इंडियन्सने दिपक चाहरला ९.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.
भूवनेश्वर कुमार आगामी हंगामात RCB कडून खेळताना दिसेल.
गुजरातने गेराल्ड कोएत्जीला २.४० कोटी मोजत आपल्या संघात स्थान दिलं आहे.
नितीश राणाला राजस्थान रॉयल्सने ४.२० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.
क्रृणाल पंड्यावर RCB संघाने ५.७५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.
चेन्नईने सॅम करनला २.४० कोटी मोजत आपल्या संघात घेतलं आहे.
मुंबईचे स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकुर आणि पृथ्वी शॉ अन्सोल्ड राहिले आहेत.
न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केन विलियम्सन आणि ग्लेन फिलिप्स अन्सोल्ड राहिले आहे.
या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनही सहभागी होणार आहे. आयपीएल 2023 मध्ये करनला पंजाब किंग्जने विकत घेतलं होतं. यावेळीही सर्वांच्या नजरा या खेळाडूवर असणार आहेत.
पहिल्या दिवसाच्या लिलावानंतर दुसऱ्या दिवशी चेन्नई सुपर किंग्सकडे 15.60 कोटी रुपये, लखनऊ सुपर जायंट्सकडे 14.85 कोटी रुपये, दिल्ली कॅपिटल्सकडे 13.80 कोटी रुपये, कोलकाता नाइट रायडर्सकडे 10.05 कोटी रुपये बाकी असल्याची माहिती आहे.
लिलावाच्या पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्स (MI) ने त्यांच्या टीममध्ये काही खेळाडूंचा समावेश केला. ज्यामध्ये त्यांनी नमन धीर, ट्रेंट बोल्ट, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा यांना खरेदी केलंय.
भारतीय स्टार ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला विकत घेण्यासाठी टीम जास्तीत जास्त पैसे खर्च करू शकतात. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, आकाश दीप यांच्यावरही कोटींची बोली लागू शकते.
परदेशात आयपीएलचा लिलाव होण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी दुबईत लिलाव झाला होता. मेगा लिलावाचा दुसरा दिवस भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.