आयपीएल २०२४ च्या पहिल्या २१ सामन्यांचं वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलयं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुढील वेळापत्र जाहीर होण्याची शक्यता आहे. आयपीएल सुरू असताना देशभरात निवडणुका सुरू होण्याची शक्यता आहे. संपूर्ण आयपीएल सामन्यांदरम्यान देशभरात निवडणुकीची चर्चा होणार. याचा विचार करत बीसीसीआयने आयपीएलचं आयोजन देशाबाहेर आयोजित करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यामुळे बऱ्याच लोकांना प्रश्न पडला आहे की, आयपीएल नेमकं कुठे खेळवली जाणार? जाणून घ्या.(Latest News)
यापूर्वी जेव्हा आयपीएल आणि निवडणुका एकत्र आल्या, त्यावेळी सुद्धा काही सामने भारताबाहेर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २००९ मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या होत्या, तेव्हा आयपीएलचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं होतं. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी भारत आणि युएई येथे सामने खेळण्यात आले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
२०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचं आयोजन दुसऱ्या देशात घेण्याचा निर्णय आयोजकांनी केला आहे. आयपीएल ही भारताची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धांपैकी एक मानली जाते. आयपीएल दरम्यान सलग २ महिने कडक अशी सुरक्षा बंदोबस्त करण्यात येतो. लोकसभेच्या वेळीदेखील पोलीस बंदोबस्ताची गरज भासते कारण त्यावेळी दंगे होण्याची शक्यता असते. जर आयपीएल आणि निवडणूक एकत्र आल्या तर बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा कमी पडू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत आयपीएलचे दोन सामने भारताबाहेर आयोजित करण्यात आले होते.
रिपोर्टनुसार बीसीसीआयचे काही उच्चपदस्थ अधिकारी दुबईत आहेत आणि ते तेथे आयपीएलचे उर्वरित सामने खेळवता येतील का याची चाचपणी केली जात आहे. बीसीसीआयने आतापर्यंत २२ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीतील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उर्वरित सामन्यांची प्रतीक्षा आहे. जर दुसरा सत्रातील सामन्यांमध्ये काही दिवसांचे अंतर असू शकते. शेवटच्या टप्प्यासाठी आयपीएलचे सामने भारतात खेळवले जाऊ शकतील, म्हणजेच प्लेऑफ आणि फायनलचे सामने भारतात होतील.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांवेळी आयपीएलचे आयोजन भारतातच करण्यात आलं होतं. त्यावेळी निवडणुका आणि सामन्यांच्या वेळांमध्ये सुरक्षा व्यवस्थेकडून चांगला समतोल राखण्यात आला होता. मतदानाची वेळ, तारीख आणि कोणत्या टप्यात होणार आहे हे लक्षात घेत सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.