आयपीएलच्या २१ वा सामना कोलकतामधील ईडन गार्डन्सवर झाला. या धकधक वाढवणाऱ्या सामन्यात लखनऊचा ४ धावांनी विजय झाला. आधी फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सचा फलंदाज मिचेल मार्श आणि निकोलस पूरणने ताबोडतोब फलंदाजीच्या जोरावर संघाने २० षटकात ३ विकेट गमावून २३८ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल, कोलकाता नाईट रायडर्सने आपला डाव शानदार पद्धतीने सुरू केला. अवघ्या १० षटकांत यजमान संघाने २ विकेट गमावल्यानंतर १२९ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. १२ षटकांच्या अखेरीस केकेआरने १४९ धावा केल्या होत्या. यानंतर १३ व्या षटक पूर्ण करण्यासाठी शार्दुल ठाकूर गोलंदाजी करायला आला. मग असे काही घडलं की जे क्रिकेट सामन्यात क्वचितच घडतं.
शार्दुल ठाकूरने आपल्या षटकाची सुरुवात वाईड चेंडूने केली. एका षटकात एक किंवा दोन वाईड बॉल टाकणे सामान्य आहे, पण शार्दुलने या षटकात एक नाही दोन नाही थेट पाच वाईड बॉल टाकले. पहिल्या चेंडूनंतर दुसरा चेंडूही वाईड झाला. तिसराही वाईड गेला. शार्दुलने तिन्ही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकले. यादरम्यान लखनऊचा कर्णधार आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत स्टार गोलंदाजाच्या या कृतीवर खूप निराश झाला. शार्दुल इथेच थांबला नाही आणि त्याने पुढचे दोन चेंडूही वाईड टाकले. याप्रमाणे शार्दुलने एका षटकात सलग ५ वाईड चेंडू टाकण्याचा लज्जास्पद विक्रम केला.
आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक ५ वाईड टाकणारा शार्दुल दुसरा गोलंदाज ठरलाय.सलग ५ वाईड बॉल टाकल्यानंतर शार्दुल ठाकूरने पहिला वैध बॉल टाकला. त्याने पुढच्या ५ चेंडूत ८ धावा दिल्या, यात एका चौकाराचा समावेश होता. शार्दुलने शेवटच्या चेंडूवर शानदार पुनरागमन केले. कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद करून सर्वांची तोंडे बंद केली. ठाकूरच्या षटकात केकेआरला १३ धावा मिळाल्या. रहाणे ३५ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला. रहाणे बाद होताच केकेआर संघावर दबाव आला आणि त्यानंतर विकेट पडू लागल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.