kaviya maran Twitter
Sports

IPL Auction 2023 मध्ये काव्या मारनचा दबदबा; अर्धा तासात खर्च केले 22 कोटी, तरीही होतेय ट्रोल

सनरायझर्स संघाने इंग्लंडचा युवा आणि आक्रमक फलंदाज हॅरी ब्रूकला 13.25 कोटी रुपयांना खरेदी केले. तर मयंक अग्रवालसाठी 8.25 कोटींची बोली लावली.

साम टिव्ही ब्युरो

IPL Auction 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या नवीन हंगामासाठी मिनी लिलाव कोची येथे पार पडलाय. या मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सीईओ काव्या मारन यांनी खेळांडूवर कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र एकीकडे लिलाव सुरु असताना काव्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. मात्र यावेळी यूजर्स काव्याला जोरदार ट्रोल केले आहे.

झालं असं की, सनरायझर्स संघाने इंग्लंडचा युवा आणि आक्रमक फलंदाज हॅरी ब्रूकला 13.25 कोटी रुपयांना खरेदी केले. तर मयंक अग्रवालसाठी 8.25 कोटींची बोली लावली. काव्या आणि हैदराबाद संघाची बोली इथेच थांबली नाही. हैदराबादने दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेन्री क्लासेनला देखील 5.25 कोटी रुपयांना आणि विव्रत शर्माला 2.60 कोटी रुपयांना खरेदी केले. (Sports News)

मिनी लिलावात काव्या मारन आणि तिच्या फ्रँचायझीने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. तिने पैशांची उधळण केली आणि अनेक खेळाडू खरेदी केले. यानंतर युजर्सनी काव्या मारनला ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरुवात केली.  (IPL 2023)

एका यूजरने अजय देवगनच्या सिनेमातील डायलॉग पोस्ट करत लिहिले की, काव्याने सुरुवातीला दोन खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 22 कोटी रुपये खर्च केले.काव्याला सांगायचे आहे की जर एखादी महागडी वस्तू सापडली नाही, तर स्वस्त वस्तू महागात खरेदी करा.

कोण आहे काव्या मारन?

काव्या मारन प्रसिद्ध उद्योगपती कलानिथी मारन यांची कन्या आहे. कलानिधी हे सन ग्रुपचे संस्थापक आहेत. कलानिथी विविध टेलिव्हिजन चॅनेल, एफएम रेडिओ स्टेशन्स, डीटीएच सेवा, वर्तमानपत्रे आणि एका फिल्म प्रोडक्शन हाऊसचे मालक आहेत. काव्या मारनने न्यूयॉर्क विद्यापीठाशी संलग्न असलेल्या लिओनार्ड एन स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले आहे. यापूर्वी काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला मंजुरी; शिपाई, क्लर्क ते अधिकाऱ्यांचा पगार कितीने वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

Malavya Rajyog: 2 नोव्हेंबरपासून मालव्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; चारही दिशांनी घरात येणार पैसा

Tirgrahi Yog: 100 वर्षांनी मंगळाच्या राशीमध्ये बनणार पावरफुल त्रिग्रही योग; 'या' 3 राशींवर बरसणार छप्परफाड पैसा

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT