Praful Hinge celebrates after taking three wickets in a single over during his sensational IPL debut. 
Sports

Praful Hinge: वैभव सूर्यवंशीसह 3 तगडे फलंदाज शुन्यावर बाद; IPLच्या इतिहासातील पहिलं सर्वात घातक षटक|Video

Praful Hinge Make IPL History: प्रफुल्ल हिंगेनं आयपीएलच्या पदार्पणात सर्वांना आश्चर्यचकित केलं. पहिल्याच षटकात तीन फलंदाजांनी शुन्यावर बाद करत अनेकांचे लक्ष वेधलं.

Bharat Jadhav

प्रफुल्ल हिंगेचा IPL मध्ये दमदार डेब्यू

पहिल्याच षटकात 3 विकेट घेत इतिहास रचला

वैभव सूर्यवंशीसह तीन फलंदाज शून्यावर बाद

आयपीएलमध्ये एखादा संघ एखाद्या खेळाडूला पहिल्यांदाच विकत घेतो, तेव्हा अनेक नवख्या खेळाडूंचे नशीब पालटत असते. अशा खेळाडूंना पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाली, आणि जर त्यांनी आपल्या पहिल्याच सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले तर अनेकांना त्यांची कामगिरी भारावून टाकत असते.

२४ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगेची कहाणी ही अशीच घटना आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळताच प्रफुल्लने आश्चर्यकारक कामगिरी केली. पहिल्याच षटकात ३ बळी घेतले. तेही तिन्ही फलंदाजांना शुन्यावर बाद केलं.

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. पण हे दोन्ही फलंदाज सपशेल अपयशी ठरले. पण अनेकांच्या तोंडी आलं प्रफुल्ल हिंगेचं नाव. विदर्भकडून खेळणाऱ्या प्रफुल्ल हिंगेने आपल्या पहिल्याच षटकात स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीला पहिल्याच चेंडूवर तंबूत परत पाठवलं.

हैदराबादसाठी पहिले षटक टाकणाऱ्या प्रफुल्लच्या पहिल्या चेंडूवर यशस्वी जैस्वालने एक धाव घेतली. त्यानंतर क्रीजवर आलेल्या वैभवने षटकातील दुसरा आणि आपला पहिलाच चेंडू उंच फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला. प्रफुल्लच्या या कामगिरीने अनेकांना आश्चर्यचकित केलं. कारण गेल्या ४ सामन्यांमध्ये वैभवने जसप्रीत बुमराह, जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांसारख्या महान गोलंदाजांच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आपली फलंदाजीला सुरुवात करत होता.

त्याच वैभवला आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रफुल्लनं बाद केलं. वैभव बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेल मैदानात आला. तोही गेल्या काही सामन्यांपासून फॉर्ममध्ये होता. पण त्यालाही प्रफुल्लनं त्याच षटकात बाद केलं. जुरेललाही एकही धाव करता आली नाही. त्यानंतर पदार्पण करणारा १९ वर्षीय लुआन-ड्रे-प्रिटोरियस आलाही त्याने बाद केलं.

प्रफुल्लच्या पहिल्याच षटकात केवळ एका धावेत तीन गडी बाद झाले. तिन्ही फलंदाज एकही धाव करू शकले नाहीत. यासह, या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने इतिहास रचला आहे. आयपीएल हंगामांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की डावाच्या पहिल्याच षटकात तीन गडी बाद झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt Bath Benefits: मीठाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे कोणते? त्वचा आणि शरीराला मिळतात अनेक लाभ

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; १० दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबई पुण्यासह महत्त्वाच्या शहरातील नवे दर

Beed : बीड पुन्हा हादरले! संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती; दोरीने बांधून तरुणाला बेदम मारहाण, दुकानातच केला खून

Accident : आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: राज्यात आज मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT