Sports

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

PBKS vs MI IPL 2026: आयपीएल २०२६ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला पराभूत केलं. या सामन्यात पंजाबने २०० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने ६ गडी राखून विजय मिळवला.

Bharat Jadhav

पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२६ चा ५८ वा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई शानदार विजय मिळवला. तर पंजाब किंग्सला सलग पाचव्या पराभवावा सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाने धावफलकावर २०० धावा केल्या होत्या.

पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली राहिली. सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रोहितने २६ चेंडूंमध्ये २५ धावा आणि रायनने २३ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या. त्यानंतर नमंधिर ६ चेंडूंमध्ये ९ धावा करून बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माने धडाकेबाज खेळी केली. त्याने ३३ चेंडूंमध्ये नाबाद ७५ धावा करून पंजाबकडून विजय खेचून आणला.

मुंबईने १९.५ षटकांत २०५/४ धावा करून ६ गडी राखून सामना जिंकला. या विजयाचा खरा नायक तिलक वर्मा होता. प्रभसिमरन सिंग आणि अझमतुल्ला उमरझाई यांनी पंजाब किंग्ससाठी चांगली कामगिरी केली, परंतु इतर कोणत्याही खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. तर शार्दुल ठाकूरने मुंबईसाठी उत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वाधिक बळी घेतले.

पंजाबच्या २०० धावा

फलंदाज म्हणून सलामी देताना प्रियांश आर्याने १७ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. प्रभसिमरन सिंगनेही ६ चौकार आणि ४ षटकारांसह ३२ चेंडूंमध्ये ५७ धावांची शानदार खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कूपर कॉनॉलीने २२ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरची बॅट आज चांगली कामगिरी करू शकली नाही. शार्दुल ठाकूरने त्याला २ चेंडूंत ४ धावांवर बाद केले. शशांक सिंगही ३ चेंडूंत २ धावांवर बाद झाला. तर मधल्या फळीत, अझमतुल्ला उमरझाईने १७ चेंडूंमध्ये ३८ धावांची वादळी खेळी केली, ज्यामुळे पंजाब किंग्सने २० षटकांत ८ गडी गमावून २०० धावा केल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fort : सह्याद्रीत लपलेले रत्न! वीकेंडला करा लोणावळ्याजवळील 'या' किल्ल्यावर ट्रेक

UPI पेमेंटवर खरोखरच चार्ज लागणार का? अखेर सत्य समोर आलं, सर्वांनाच मिळाला दिलासा

Bollywood Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कुत्र्याने केला हल्ला; थोडक्यात वाचला जीव, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कुंभार्ली घाटाची अक्षरशः चाळण; खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीवघेणा प्रवास

Rain Update : राज्यात विजांसह मुसळधार पाऊस, नाशिकसह ७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT