Sports

IPL 2026: प्रफुल्ल हिंगे आणि हुसैनच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानचा सुफडासाफ; हैदराबादचा शानदार विजय

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: आयपीएलच्या सुरुवातीपासून राजस्थान रॉयल्सने सलग चार विजय नोंदवले होते. पण सनरायझर्स हैदराबादने त्यांना आज पराभवाची चव चाखवली. हैदराबादनं या हंगामातील दुसरा विजय मिळवला आहे. या सामन्यात हैदराबादने ५७ धावांनी शानदार विजय मिळवला.

Bharat Jadhav

  • सनरायझर्स हैदराबादचा ५७ धावांनी शानदार विजय

  • प्रफुल्ल हिंगे आणि हुसैनची भेदक गोलंदाजी

  • राजस्थान रॉयल्सची विजयाची मालिका खंडित

आयपीएल २०२६ मध्ये प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत सलग चार विजय नोंदवणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा आज धु्व्वा उडाला. या हंगामातील सलग पाचवा विजय मिळवण्याच्या विश्वासाने मैदानात उतरलेल्या राजस्थानला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सनरायझर्स हैदराबादचा नवा स्टार प्रफुल्ल हिंगे याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच राजस्थानच्या फलंदाजीला सुरुंग लावला. त्याने ४ विकेट घेत ३४ धावा दिल्या.

त्याच्यासोबत साकीब हुसैननं शानदार गोलंदाजी करत ४ विकेट घेतल्या. या दोन्ही गोलंदाजाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने ५७ धावांनी विजय मिळवला. कर्णधार इशान किशनच्या ९१ धावांच्या स्फोटक खेळीने हैदराबादच्या विजयाचा पाया रचला गेला होता.

प्रफुल्ल-साकिबने राजस्थानची फलंदाजी उद्धवस्त केली

सनरायझर्स हैदराबादनं दिलेल्या २१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अत्यंता वाईट झाली. सुरुवातीला २१७ धावांचे आव्हान राजस्थान सहजगत्या पार करेल असं वाटत होतं. परंतु त्यांना माहिती नव्हतं की त्यांचा गाठ विदर्भाचा खेळाडू प्रफुल्ल हिंगेशी पडणार आहे. प्रफुल्लनं आपल्या गोलंदाजीनं अनेकांना प्रभावित तर केलेच शिवाय राजस्थान मोठा धक्काही दिला.

गेल्या चार सामन्यापासून फॉर्ममध्ये असलेल्या आणि धाकड फलंदाजी करणाऱ्या वैभवला त्याने शुन्यावर बाद केलं. सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर होत्या, त्याच्याकडून आणखी एका दमदार खेळीची अपेक्षा होती. पण प्रफुल्ल हिंगेने पहिल्याच षटकात त्याला बाद केलं.तेही शुन्यावर. आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या प्रफुल्ल हिंगेने दुसऱ्याच चेंडूवर वैभवला बाद केले आणि त्यानंतर पुढच्या चार चेंडूंमध्ये ध्रुव जुरेलसह आणखी दोन बळी घेतले. प्रफुल्लने आपल्या पहिल्याच षटकात तीन बळी घेऊन इतिहास रचला.

तिन्ही फलंदाज एकही धाव करू शकले नाहीत. त्यानंतर पुढच्याच षटकात पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज शकिबने एक बळी घेतला. तिसऱ्या षटकात प्रफुल्लने आणखी एक बळी घेत राजस्थानला पूर्णपणे हादरवलं. राजस्थानने तीन षटकांत अवघ्या नऊ धावांत पाच गडी गमावले होते. त्यानंतर डोनोव्हान फरेराने ६९ आणि रवींद्र जडेजा ४५ धावा करून डाव सावरला. त्यांनी १२२ धावांची भागीदारी केली. पण प्रफुल्लनंतर पदार्पण करणाऱ्या शकिबने फरेराला बाद केले. शकिबनेही चार बळी घेतले. राजस्थानचा संघ अवघ्या १५९ धावावर गारद झाला.

हैदराबादमधील उप्पल स्टेडियमवर यजमान सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी केली. परंतु त्यांच्या सुरुवातीला संघाने चाहत्यांना निराश केले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर स्टार सलामीवीर अभिषेक शर्मा जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला. ट्रॅव्हिस हेडलाही मोठी किंवा जलद खेळी करता आली नाही. पण त्यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार इशान किशननं स्फोटक फलंदाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली.

ईशानने अवघ्या ३० चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि अखेरीस ४४ चेंडूंमध्ये ९१ धावांची धडाकेबाज खेळी करून तो बाद झाला. त्याने आणि हेनरिक क्लासेनने तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली होती. या भागीदारीमुळे डाव सावरला. क्लासेननेही उपयुक्त अशा ४० धावा केल्या. त्यानंतर नितीश रेड्डी (२८) आणि सलील अरोरा (२४) यांनी अखेरीस मोठे फटके मारून संघाला २१७ धावांपर्यंत पोहोचवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला

Cricket News : क्रीडा विश्वावर शोककळा! दिग्गज खेळाडूचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन

Terror Attack : दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान हादरला, पोलीस ठाण्यात तैनात जवानांवर गोळीबार, ९ जणांचा मृत्यू

बाजारातली नकली आणि खरी बटाटी कशी ओळखायची? खरेदी करण्यापूर्वी 5 ट्रिक्स ठेवा लक्षात

तुकाराम मुंढेंना राज्यातील पहिला मोठा झटका; गोरस भंडार प्रकरणात उच्च न्यायालयाचा FDA ला दणका

SCROLL FOR NEXT