Virat Kohli reacts in awe after Tim David smashes a massive six during IPL match. saam tv
Sports

Virat Kohli: बुलेटच्या वेगात चेंडू सीमेपार; टीम डेविडचा शॉट पाहून चक्रावला कोहली, विराटची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Virat Kohli Reaction Viral: आयपीएल २०२६ मध्ये टिम डेव्हिडने मारलेल्या शक्तिशाली षटकाराने विराट कोहलीला चकित केले. या उत्तुंग फटक्यावर कोहलीची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Bharat Jadhav

  • टीम डेव्हिडचा जबरदस्त षटकार चर्चेत

  • विराट कोहलीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल

  • आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रंगला

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुला यंदाच्या आयपीएलमधील हंगामातील दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आरसीबीने या हंगामातील आपला सहावा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला. आरसीबीनं नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाकडून विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली, परंतु असे असूनही, संघ २० षटकांत केवळ १७५ धावाच करू शकला.

आरसीबीकडून फिल सॉल्टने सर्वाधिक ६३ धावा केल्या. सॉल्टनंतर टीम डेव्हिड २६ धावांसह दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. डेव्हिडने आपल्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार मारला. याच दरम्यान त्याने लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारला. हा शॉट पाहून विराट कोहली चक्रावून गेला. तो आनंदाने ज्या खुर्चीवर बसला होता, त्या खुर्चीवर उठून टाळ्या टिपू लागला. दरम्यान टिम डेव्हिडने चेंडू इतक्या जोरात मारला की तो सीमारेषेच्या पलीकडे गेला. डेव्हिडच्या शॉटनंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया आता व्हायरल होतेय.

हिरव्या जर्सीमध्ये आरसीबीचा दहाव्यांदा पराभव

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीने हिरवी जर्सी परिधान केली होती. पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आरसीबी दरवर्षी हिरव्या जर्सीमध्ये एक सामना खेळते. मात्र, या जर्सीमधील संघाची कामगिरी खराब राहिलीय. आरसीबी २०११ पासून हिरव्या जर्सीमध्ये खेळत आहे. आतापर्यंत खेळलेल्या १६ सामन्यांमधील हा संघाचा १०वा पराभव होता. या जर्सीमध्ये आरसीबीने केवळ पाच वेळा विजय मिळवला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT