Rajasthan Royals vs RCB, IPL 2026 match result : राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (आरसीबी) ६ गडी राखून धुव्वा उडवला. गुवाहाटीच्या मैदानाच आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २०१ धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. आरसीबीने दिलेले २०२ धावांचे लक्ष्य राजस्थानने १८ षटकांतच अगदी सहज पूर्ण केले. वैभवच्या वादळात आरबीचा धुव्वा उडाला. त्याने अवघ्या २६ चेंडूत ७८ धावांची तुफानी खेळी करत आरसीबीच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. त्याला ध्रुव जुरेलने मोलाची साथ दिली. जुरेलने नाबाद ८१ धावा ठोकून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आरसीबीच्या गोलंदाजांना या दोन्ही फलंदाजांनी मैदानात चोहोबाजूला फटके मारले, ज्यामुळे सामना एकतर्फी झाला.
राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा दारूण पराभव करत सलग चौथ्या विजयाची नोंद केली. या विजयासह राजस्थान गुणतालिकेत ८ गुणांसह अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर यंदाच्या हंगामात बलाढ्य आरसीबीचा हा पहिला पराभव ठरलाय. टॉप ऑर्डर फेल गेल्यामुळे आरसीबीची धावसंख्या २०१ धावांपर्यंत पोहचू शकली.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB):
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २०१ धावांचा मोठा डोंगर उभा केला. कर्णधार रजत पाटीदारने ४० चेंडूत ६३ धावांची दमदार खेळी करत संघाचा डाव सावरला. विराट कोहलीने १६ चेंडूत ३२ धावांची वेगवान सुरुवात करून दिली, तर शेवटी व्यंकटेश अय्यरने अवघ्या १५ चेंडूत २९ धावा ठोकून संघाला २०० पार नेले. गोलंदाजीमध्ये मात्र आरसीबीला संघर्ष करावा लागला. कृणाल पांड्या आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी २ बळी घेतले खरे, पण राजस्थानच्या फलंदाजांना रोखण्यात ते अपयशी ठरले.
राजस्थानने हे २०२ धावांचे मोठे आव्हान १८ षटकांतच ६ गडी राखून सहज पूर्ण केले. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने अवघ्या २६ चेंडूत ७८ धावांची तुफानी खेळी केली, तर ध्रुव जुरेलने नाबाद ८१ धावा ठोकून संघाला विजय मिळवून दिला. या दोघांच्या फटकेबाजीमुळे सामना एकतर्फी झाला. गोलंदाजीमध्ये राजस्थानच्या जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई आणि ब्रिजेश शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. बिश्नोईने विराट कोहलीला बाद करून महत्त्वाची विकेट मिळवली, ज्यामुळे आरसीबीची मधली फळी गडगडली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.