गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान आणि बेंगळुरू यांच्यामध्ये रॉयल लढत आज होत आहे. पावसामुळे सामन्यात अडथळा आलाय. नाणेफेक झाली, पण पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे खेळ थांबला आहे. रियान पराग याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या रॉयल लढतीत दोन्ही संघाने मॅच विनर खेळाडूंना बाहेर बसवले आहे. राजस्थान आणि आरसीबी या दोन्ही संघामध्ये एक एक बदल करण्यात आला आहे. राजस्थान संघाने तुषार देशपांडेला आराम दिला आहे. तर आरसीबीने जेकब डफी याला संघाबाहेर बसवलेय.
आरसीबीने मॅचविनरला दाखवला बाहेरचा रस्ता -
आयपीएल २०२६ च्या हंगामात आरसीबीने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवलाय. याच विजयात जेकब डफी याचा सिंहाचा वाटा होता. दोन्ही सामन्यात जेकब डफी याने महत्त्वाच्या विकेट घेतल्या होत्या. दोन सामन्यात डफीने ५ फलंदाजांना तंबूत धाडले. डफीने पहिल्या सामन्यात सामनावीर पुरस्कारही पटकावला होता. पण याच मॅचविनर खेळाडूला आरसीबीने संघाबाहेर बसवले आहे. आरसीबीने जेकब डफीच्या जागी अनुभवी जोश हेजलवूड याला संघात स्थान दिलेय.
विराट कोहली, फिल साल्ट, देवदत्त पड्डीकल, रजत पाटीदर (कर्णधार), टीम डेविड, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमरिओ शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, अभिनंदन सिंग
इम्पॅक्ट प्लेअर - सुयेश शर्मा, जेकब बेथल, रासीक दार, कौशिक चौव्हान, वेंकटेश अय्यर
राजस्थानच्या संघातही महत्त्वाचा बदल -
आरसीबीने आपला प्रमुख गोलंदाज जेकब डफी याला संघाबाहेर बसवले. तर राजस्थानने आपला डेथ ओव्हर स्पेशालिस्ट तुषार देशपांडे याला प्लेईंग ११ च्या बाहेर बसवले आहे. गुजरातविरोधात तुषार देशपांडे याने अखेरच्या षटकात भेदक मारा केला होता. तुषार देशपांडेने अखेरच्या ओव्हरमध्ये १० धावा वाचवल्या होत्या. तुषार देशपांडे याला राजस्थानने आराम दिला. तर ब्रिजेश शर्मा याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेय.
राजस्थानच्या ताफ्यात कोण कोणते खेळाडू?
यशस्वी जायस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिमरन हेटमायर, डोनोवन फेरेरिया, रवींद्र जाडेजा, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, रवी बिश्नोई
इम्पॅक्ट प्लेअर - वैभव सूर्यवंशी, रवी सिंग, शुभम दुबे, तुषार देशपांडे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.