ipl 2025 Yuzi Chahal returns to Punjab Kings  Saam Tv News
Sports

MI vs PBKS Qualifier 2 : श्रेयसचा हुकमी एक्का परतला; हार्दिकचं टेन्शन वाढलं, मुंबईविरुद्ध कुणाची एन्ट्री?

Yuzvendra Chahal IPL 2025 : पंजाब किंग्स संघानं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात एक महत्त्वाचा बदल केला आहे. संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल पंजाबच्या संघात परतला आहे.

Prashant Patil

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्सनं मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाब आणि मुंबई यांच्यातील या सामन्यात जो संघ जिंकेल तो ३ जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना करेल. आयपीएल २०२५चा अंतिम सामनाही नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

पंजाब किंग्स संघानं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात एक महत्त्वाचा बदल केला आहे. संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल पंजाबच्या संघात परतला आहे. दुखापतीमुळे गेल्या दोन सामन्यांमध्ये चहल संघाकडून खेळला नव्हता. विशेषतः पहिल्या क्वालिफायर सामन्यात संघाला चहलची खूप उणीव भासली, परंतु करो किंवा मरोच्या या सामन्यामध्ये चहल संघासाठी मैदानात दिसणार आहे.

दरम्यान, जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर यापूर्वीच्या सामन्यांमध्ये नेमकं काय घडलं होतं? ते पाहिलं जाईल. यापूर्वी कोणत्या संघाने कशी कामगिरी केली, हे पाहणे महत्वाचं ठरतं. त्यासाठी पॉइंट्स टेबल पाहिलं जाईल. प्ले ऑफपूर्वी पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईचा संघ हा चौथ्या स्थानावर होता, तर पंजाब किंग्सचा संघ अव्वल स्थानावर विराजमान होता. त्यामुळे जर या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर फायनलमध्ये पंजाब किंग्सला पाठवलं जाईल आणि मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे या सामन्याला पावसाचा फटका बसला तर तो मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी असू शकते.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज - प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वडेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमतुल्ला उमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.मुंबई- रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रीस टॉपली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT