IPL 2025 Dates Google
Sports

IPL 2025: आला रे आला, आयपीएलचा सीझन आला! 'या' दिवसापासून सुरू होणार सामन्यांचा थरार

IPL 2025: BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या हंगामाबाबत मोठे वक्तव्य केलंय. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुढील हंगामाची तारीख जाहीर केली.

Bharat Jadhav

इंडियन प्रीमियर लीग 2025 सीझन संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. यावेळी हंगाम कोणत्या तारखेपासून सुरू होणार याची तारीख जाहीर झालीय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रविवारी (१२ जानेवारी) ही माहिती दिली आहे. आयपीएलच्या पुढील हंगामाचा निर्णय बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत (एजीएम) घेण्यात आला. राजीव शुक्ला यांनी बैठकीनंतर तारीख जाहीर केली आहे.

IPL 2025 टुर्नामेंटच्या तारखा जाहीर

आयपीएल 2025 चा हंगाम 23 मार्चपासून सुरू होणार आहे. परंतु या मोसमातील पहिला सामना कोणत्या संघांमध्ये खेळवला जाईल हे सध्या निश्चित झालेले नाहीये. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजीव शुक्ला म्हणाले की, बैठकीत एकच मोठा मुद्दा होता, तो म्हणजे खजिनदार आणि सचिव निवडीचा. यासह आयपीएल आयुक्तांची नियुक्तीही एका वर्षासाठी करण्यात आलीय. त्यांनी पुढे सांगितले की, आयपीएल 2025 ची स्पर्धा 23 मार्चपासून सुरू होणार आहे.

तर महिला प्रीमियर लीगची ठिकाणे देखील निश्चित करण्यात आली आहेत, ते लवकरच जाहीर केली जातील. मागील सत्रात 22 मार्च रोजी आयपीएलचे सामने सुरू झाले होते. तेव्हा हंगामातील पहिला सामना RCB आणि CSK यांच्यात खेळला गेला. तर, 26 मे रोजी KKR आणि हैदराबाद संघांमध्ये अंतिम सामना झाला होता. त्यानंतर केकेआर संघाने अंतिम फेरीत विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन बनला. यावेळी अंतिम सामना केकेआरच्या होम ग्राउंड ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो.

दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. अलीकडेच बातम्या समोर आल्या होत्या की बीसीसीआयने संघ निवडण्यासाठी आयसीसीकडे आणखी वेळ मागितलाय. अशा परिस्थितीत राजीव शुक्ला यांनीही संघाची निवड केव्हा होणार याबाबत मोठा अपडेट दिलीय. राजीव शुक्ला यांनी सांगितलं की, निवड समितीची बैठक १८ किंवा १९ जानेवारीला होणार आहे. यानंतरच भारतीय संघाची घोषणा केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT