ipl 2025 twitter
क्रीडा

IPL 2025: आयपीएल रिटेंशनमध्ये या युवा खेळाडूंना लय डिमांड! एकाला तर ११ कोटी मिळणार

IPL Retention 2025: आज आयपीएल रिटेंशनची यादी जाहीर करण्याचा शेवटचा दिवस आहे.

Ankush Dhavre

IPL 2025 Retention: आयपीएल २०२५ स्पर्धेचा लिलाव सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या लिलावापूर्वी ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे.

यावेळी रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये युवा खेळाडूंचा सर्वाधिक सहभाग असणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये नवा नियम लागू केला गेला आहे. सर्व फ्रेंचायझींना अन्कॅप्ड खेळाडूंना रिटेन करता येणार आहे.

त्यामुळे फ्रेंचायझींकडे आपल्या युवा खेळाडूंना कमी पैशात रिटेन करण्याची संधी असणार आहे. यासह आणखी काही युवा खेळाडू आहेत जे या लिलावात मालामाल होऊ शकतात. दरम्यान कोणत्या स्टार खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते? जाणून घ्या.

अभिषेक शर्मा -

अभिषेक शर्मा हा आयपीएल २०२५ स्पर्धेत रिटेन होणारा सर्वात महागडा युवा खेळाडू ठरु शकतो. आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत त्याने धावांचा पाऊस पाडत संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली होती. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ त्याला कुठल्याही परिस्थितीत हातून जाऊ देणार नाही. माध्यमातील वृत्तानुसार, सनरायझर्स हैदराबाद त्याला ११ कोटी रुपयात रिटेन करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

नितिश कुमार रेड्डी

नितिश कुमार रेड्डी देखील गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघात होता. या संघाकडून खेळताना त्याने फलंदाजीसह गोलंदाजीतही शानदार कामगिरी केली होती. माध्यमातील वृत्तानुसार, सनरायझर्स हैदराबादने नितिश कुमार रेड्डीला रिटेन करण्याचा प्लान केला आहे.

तुषार देशपांडे

मुंबईचा मराठमोळा गोलंदाज तुषार देशपांडे चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतोय. या संघाकडून खेळताना त्याला नव्या चेंडूंने गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. सुरुवातीला गोलंदाजी करताना त्याने १३ सामन्यांमध्ये १७ गडी बाद केले होते. या हंगामात जर चेन्नईने त्याला रिलीज केलं. तर इतर संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी जोर लावू शकतात.

आयुष बदोनी

आयुष बदोनीने आयपीएल २०२४ स्पर्धा लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना गाजवली होती. या संघाकडून खेळताना त्याने फिनिशरची भूमिका योग्यरित्या पार पाडली होती. त्याची ही कामगिरी पाहता लखनऊ सुपर जायंट्सचा संघ त्याला रिटेन करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT