Sports

RCB vs PBKS Weather: नाणेफेक आधी पावसाची बॅटिंग; सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार पॉईट्स?

RCB vs PBKS Weather: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज आयपीएल २०२५ चा ३४ वा सामना आज बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जातोय. पावसामुळे आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामन्याचा नाणेफेक उशिराने होणार आहे.

Bharat Jadhav

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज आयपीएल २०२५ चा ३४ वा सामना आज बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. परंतु पावसामुळे व्यत्यय आलाय. आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामन्याची नाणेफेक पावसामुळे झाली नाहीये.बेंगळुरू विरुद्ध पंजाब सामन्यावर पावसाची सावली आहे.

जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी एक गुण दिला जाणार जाणार आहे. सध्याच्या आयपीएल २०२५ च्या पॉइंट्स टेबलमध्ये आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहे आणि पंजाब किंग्ज चौथ्या स्थानावर आहे.

जर आरसीबी विरुद्ध पंजाब सामन्यात पाऊस खलनायक ठरला आणि सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या एका गुणासह, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मोठी झेप घेईल आणि पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. पंजाबला एक पॉईंट मिळाला तर पंजाबचे ९ गुण होतील. या पॉईंट्सह ते तिसऱ्या स्थानावर येतील.

आरसीबी विरुद्ध पीबीकेएस हवामान अहवाल

शुक्रवारी बेंगळुरूमध्ये काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता अॅक्युवेदरने वर्तवलीय. दुपारी तापमान ३४ अंश होतं. प्रदेशाच्या काही भागात गडगडाटी वादळाची शक्यता आहे'. संध्याकाळी पावसाची शक्यता कमी होती. परंतु सामन्याच्या वेळेपर्यंत ढगाळ वातावरण होतं.

आयपीएल २०२५ मध्ये, या हंगामातील ३४ वा लीग सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होतोय. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हे दोन्ही संघ भिडणार आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत उत्तम खेळ केला आहे.

दोन्ही संघांनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलीय. आरसीबी आणि पंजाब दोघांनीही ६-६ सामने खेळले आहेत आणि त्यापैकी दोघांनी ४-४ सामने जिंकली आहेत. आरसीबी संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पंजाब किंग्ज संघ चौथ्या क्रमांकावर आहे.

पंजाब किंग्जचा संघ

प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंह (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, जोश इंग्लिस, शशांक सिंह, ग्लेन मॅक्सवेल, मार्को यान्सन, जेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, विजयकुमार वैशाख, सूर्यांश शेडगे, यश ठाकुर, हरप्रीत बराड़, प्रवीण दुबे, पायला अविनाश, मुशीर खान, हरनूर सिंह, कुलदीप सेन, अजमतुल्लाह उमरजई, आरोन हार्डी, विष्णु विनोद, मार्कस स्टोयनिस.

आरसीबीचा संघ

फिल साल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), लियम लिविंगस्टन, जीतेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेविड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, यश दयाल, देवदत्त पडिक्कल, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जैकब बेथेल, स्वप्निल सिंह, अभिनंदन सिंह, स्वास्तिक चिकारा, मोहित राठी, नुवान तुषारा, रोमारियो शेफर्ड, लुंगी एनगिडी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT