mumbai indians ipl 2025 x
Sports

Qualifier 2 सामना जिंकण्यासाठी मुंबईला करावी लागेल फक्त एक गोष्ट, मग IPL 2025 फायनलचं तिकीट होईल पक्कं

MI Vs PBKS Qualifier 2 IPL 2025 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स हा क्वालिफायर २ सामना खेळला जाणार आहे. या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये जाईल.

Yash Shirke

IPL 2025 चा दुसरा क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये रंगणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी क्वालिफायर २ सामना जिंकणे आवश्यक आहे. आजचा (१ जून) सामना जिंकून फायनलमध्ये कोणता संघ जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२५ मधील क्वालिफायर २ आणि फायनल असे दोन सामने खेळले जाणार आहे. आकडेवारीनुसार, या मैदानावर टॉस जिंकणाऱ्या संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. त्यातही टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी ठरला आहे. सातपैकी सहा सामन्यांमध्ये ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली, त्यांचा विजय झाला आहे. तेव्हा टॉस जिंकण्याचा (आणि प्रथम फलंदाजी करण्याचा) दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.

खेळपट्टी आणि हवामानाचा अहवाल

आयपीएल २०२५ मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यांमध्ये संघांनी मोठी धावसंख्या केल्याचे पाहायला मिळाले आहे. मैदानाची खेळपट्टी ही फलंदाजी करण्यासाठी अनुकूल आहे. अहमदाबादमध्ये स्वच्छ वातावरण असेल, संध्याकाळी तापमान २८ डिग्री सेल्सियरच्या जवळपास असेल, हवेत आर्द्रतेचे प्रमाण ५० ते ६५ टक्के राहील असा अंदाज हवामान खात्याने केला आहे.

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हा सामना जर पावसामुळे किंवा अन्य कारणांमुळे रद्द झाला, तर मुंबईच्या संघाचे आव्हान संपुष्टात येईल. आयपीएलच्या नियमांनुसार, क्वालिफायर २ सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि सामना रद्द झाल्यास पॉईंट्स टेबलवर खालच्या क्रमावर असणारा संघ बाद होईल. पंजाब सध्या टेबल टॉपर्स आहेत. त्यामुळे सामना रद्द झाल्यास पंजाब किंग्सचा संघ फायनलमध्ये जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

SCROLL FOR NEXT