पंजाब किंग्सने लखनऊ सुपरजायंट्सवर ८ गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शानदार गोलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांनी श्रेयसचा हा निर्णय योग्य ठरवला. अर्शदीप सिंगच्या शानदार गोलंदाजीमुळे लखनऊचा संघाचे तीन गडी बाद केले. लखनऊ संघाने पंजाबसमोर १७१ धावांचे आव्हान ठेवलं होतं.
पंजाबच्या गोलंदाजांनी लखनऊच्या फलंदाजांना दबावात ठेवलं. पहिल्याच षटकात विकेट गमावल्यानंतर लखनऊचा संघ थोडा बॅकफूटवर गेलेला दिसला. दरम्यान लखनऊच्या संघाने दिलेल्या १७२ धावांचे आव्हान पंजाबने १६.२ षटकांत पार केलं.
या विजयासह पंजाब संघाची पॉइंट्स टेबलमध्ये सरशी झालीय. त्याचबरोबर पंजाबच्या विजयाचा फायदा मुंबई इंडियन्सला देखील झालाय. पंजाबच्या या विजयाने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलटफेर झालीय. पंजाबच्या संघाने लखनऊ सुपर जायंट्सचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे, त्यामुळे त्याचा नेट रनरेट चांगला झाला आहे. दरम्यान, दुसऱ्या पराभवानंतर लखनऊ संघाची स्थिती खराब झालीय. लखनऊचा संघ पॉइंट्स टेबलच्या टॉप ४ मधून बाहेर गेलाय. तर पंजाबचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तर आरसीबीने अव्वलस्थान कायम राखले आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ चार गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबी, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सने प्रत्येकी दोन सामने जिंकून चार गुण मिळवले आहेत. तर उर्वरित सात संघांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. या गुणांमुळे आयपीएलमधील आगामी सामने जास्त रंजक होतील. पंजाबच्या विजयाने मुंबई इंडियन्सला कसा फायदा झाला. ते जाणून घेऊ.
पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईचा संघाचा झालेल्या दोन पराभवामुळे पॉइंट्स टेबलच्या क्रमवारीत सर्वात खाली होता. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ हा सहाव्या स्थानी आला. आज पंजाबने लखनऊचा पराभव केल्यानं मुंबईचा संघ पॉईट्स टेबलमधील पाचव्या स्थानी पोहोचलाय.
तर LSG संघाकडे फक्त दोन गुण आहेत. या संघाने तीन सामने खेळलेत. परंतु पंजाबकडून मिळालेल्या पराभवानंतर लखनौच्या संघाला आता टॉप ४ मधून बाहेर पडावे लागणार आहे. गुजरात टायटन्सचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे, तर मुंबई इंडियन्स पाचव्या क्रमांकावर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.