Ind vs Pak IPL 2025 X
Sports

IPL 2025 वर भारत-पाक युद्धाचं सावट, पंजाब विरुद्ध दिल्ली सामना रद्द; पुढे काय होणार?

Ind vs Pak IPL 2025 : पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतावर हल्ला केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएलमधील पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना रद्द करण्यात आला आहे.

Yash Shirke

धरमशाला येथे पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना सुरु होता. पण पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना रद्द करण्यात आला आहे. पाकिस्ताने गुरुवारी रात्रीच्या वेळेस जम्मू शहरावर ड्रोनने हल्ला केला. त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. पाकिस्तानने ८ मिसाईल्स सोडून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या एस ४०० या डिफेन्स सिस्टीमने हा हल्ला परतवून लावला. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना देखील भारताने प्रत्युत्तर दिले. जम्मू, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर आयपीएलचा पंजाब विरुद्ध दिल्ली हा सामना थांबवण्यात आला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेतला होता. पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे भारतीय लष्कराने नष्ट केले होते. त्यानंतर पाकिस्तानने सीमावर्ती भागांवर गोळीबार केला होता. त्यानंतर काल (७ मे) पाकिस्तानने भारतातील १५ ठिकाणी मिसाईलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण भारताच्या डिफेन्स सिस्टीम एस-४०० ने हा हल्ला परतवून लावला.

जम्मू-काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. एअरपोर्टवर हल्ल्याचा आवाज आल्याने सगळीकडे ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. हवाई हद्दीत ड्रोन दिसल्याने लष्कर अलर्ट मोडवर आलं आहे. सतवारी कॅम्पसमध्ये हा हल्ल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पठाणकोट आणि पुंछमध्ये सायरनचा आवाज देण्यात आला आहे. पंजाबच्या गुरुदासपूर आणि राजस्थानच्या सीमेलगतच्या भागावर ब्लॅकआऊट करण्यात आलेला आहे. भारताच्या S-400 ने पाकिस्तानचे ८ मिसाईल पाडले आहेत.

सुरक्षेचा उपाय म्हणून राजस्थान, पंजाब आणि जम्मूकाश्मीर या ३ राज्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आहे. लोकवस्तीच्या ठिकाणी ड्रोन पाठवून पाकिस्तानने हल्ले करण्याचे प्रयत्न केले आहेत. हे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. जम्मूनंतर पंजाबच्या पठाणकोट एअरबेसवर जोरदार गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुणे हादरलं! पाठलाग केला, जबरदस्तीने जंगलात नेलं अन्...; महिलेसोबत नको ते घडलं

Pigeon Cooing Sign: कबुतराचा कुरकुरण्याच्या आवाजाचे संकेत काय? जाणून घ्या आनंदाची बातमी

Swapnil Joshi : हिंदी शिकणाऱ्यांना हिंदी शिकू द्यावी, पण...; मराठीच्या मुद्यावर स्वप्निल जोशी स्पष्टच बोलला

Mens Care Tips: मुलांनो, हँडसम दिसायचंय? मग या गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: कल्याण जवळील आंबिवलीत बिबट्याच दर्शन

SCROLL FOR NEXT