Rohit Sharma Virat Kohli X
Sports

IPL 2025 : हिटमॅनच्या नावावर नवा विक्रम; विराटला मागे टाकलं, फक्त ४ तासांतच पुन्हा स्थान गाठलं

Rohit Sharma Virat Kohli : काल रविवारच्या डबल हेडर सामन्यांमध्ये ROKO चा खेळ पाहायला मिळाला. दुपारच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार खेळी केली. तर रात्रीच्या सामन्यात रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली.

Yash Shirke

IPL 2025 : विराट कोहलीने पंजाब किंग्स विरुद्ध दमदार खेळी केली. १५७ धावांचे लक्ष गाठताना विराटने ५४ चेंडूंमध्ये ७३ धावा केल्या. यात ७ चौकार आणि १ षटकार यांचा समावेश होता. सलामीसाठी मैदानात उतरलेला विराट सामना संपेपर्यंत मैदानात टिकून होता. सामन्यातील योगदानामुळे विराट कोहली 'प्लेयर ऑफ द मॅच' बनला.

कालच्या सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच बनून विराट कोहलीने रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली. त्या वेळेस आयपीएलमध्ये सर्वात जास्त वेळा प्लेयर ऑफ द मॅच जिंकणारा भारतीय क्रिकेटपटू हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहित १९ सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच ठरला होता. पंजाब विरुद्ध बंगळुरू सामन्यानंतर रोहितसह विराटच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली.

वानखेडे स्टेडियमवर काल मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना खेळला गेला. या सामन्यात फलंदाजी करताना ४५ चेंडूंवर ७६ धावा केल्या. या खेळीमुळे रोहित शर्मा कालच्या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच बनला. सर्वात जास्त वेळा प्लेयर ऑफ द मॅच बनण्याच्या विक्रमामध्ये रोहितने पुन्हा विराटला मागे टाकले. रोहित २० वेळा प्लेयर ऑफ द मॅच बनला आहे.

आयपीएलच्या इतिहासात एबी डिव्हिलियर्स सर्वात जास्त सामन्यात म्हणजेच २५ सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच बनला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर ख्रिस गेल आहे. गेलने २२ वेळा प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. यादीच्या तिसऱ्या स्थानी रोहित शर्मा आहे. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT