ipl auction yandex
Sports

IPL 2025: गेल्या हंगामातील कोट्याधीश, आगामी हंगामात या 5 खेळाडूंना Base Price मिळणंही कठीण

IPL 2025 Mega Auction: येत्या २४ आणि २५ नोव्हेंबरला मेगा ऑक्शन होणार आहे. दरम्यान या ऑक्शनमध्ये काही खेळाडू आहेत, जे अन्सोल्ड होऊ शकतात.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेचा लिलाव येत्या २४-२५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेह्हादमध्ये होणार आहे. या लिलावापूर्वी सर्व संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. १० खेळाडूंना कोट्यावधी रुपये देऊन रिटेन करण्यात आलं आहे.

तर १५०० हून अधिक खेळाडूंनी लिलावासाठी आपलं नाव नोंदवलं आहे. यापैकी २०४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. लिलावात बोली लागणाऱ्या खेळाडूंपेक्षा अन्सोल्ड राहणाऱ्या खेळाडूंची संख्या अधिक असणार आहे. दरम्यान काही असेही खेळाडू आहेत, जे गेल्या हंगामात महागडे खेळाडू ठरले होते. मात्र आगामी हंगामात अन्सोल्ड होऊ शकतात.

१. स्पेंसर जॉन्सन -

स्पेंसर जॉन्सन हा गेल्या हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसून आला होता. या हंगामात खेळताना ४ गडी बाद केले होते. त्याचा या वर्षातील रेकॉर्ड पाहिला, तर त्याला ५ सामन्यांमध्ये केवळ ६ गडी बाद करता आले आहेत. गेल्या हंगामात त्याला १० कोटी रुपये मिळाले होते. मात्र या हंगामात सोल्ड होणंही कठीण आहे.

२. राइली रुसो

गेल्या हंगामात पंजाब किंग्जने राइली रुसोला ८ कोटी रुपये देऊन आपल्या संघात स्थान दिलं होतं. आपल्या टी-२० कारकिर्दीत त्याने ९००० हून अधिक धावा केल्या आहेत. मात्र त्याला गेल्या हंगामात आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे पंजाबने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

३. झाय रिचर्डसन-

आयपीएल २०२४ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने झाय रिचर्डसनला ५ कोटी रुपये देत आपल्या संघात स्थान दिलं होतं. मात्र गेल्या हंगामात त्याला केवळ १ सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला मैदानात उतरता आलं नाही. तो ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग खेळतो. ऑस्ट्रेलियात खेळताना त्याचा रेकॉर्ड दमदार आहे. मात्र भारतातील खेळपट्टीवर त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे आगामी हंगामात त्याच्यावर बोली लागण्याची शक्यता खूप कमी आहे.

४. डेव्हिड विली

आयपीएल २०२४ स्पर्धेत डेव्हिड विली लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळणार होता. मात्र काही कारणास्तव त्याने आपलं नाव मागे घेतलं होतं. गेल्या हंमामात त्याच्यावर २ कोटी रुपयांची बोली लागली होती. मात्र या हंमामात त्याच्यावर बोली लागण्याची शक्यता खूप कमी आहे.

५. अल्जारी जोसेफ

वेस्टइंडीजचा वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफला गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ११.५० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं होतं. मात्र त्याला केवळ ३ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या ३ सामन्यांमध्ये त्याला केवळ १ गडी बाद करता आला होता. सातत्याने फ्लॉप कामगिरी आणि दुखापतग्रस्त असल्यामुळे कुठलाही संघ त्याच्यावर बोली लावण्याची शक्यता खूप कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

SCROLL FOR NEXT