ipl auction yandex
Sports

IPL 2025 Mega Auction: कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? कोण किती खेळाडू विकत घेऊ शकतो? जाणून घ्या

IPL 2025 Remaining Purse Amount Of Franchise: आयपीएल २०२५ स्पर्धेचा लिलाव येत्या २४ आणि २५ नोव्हेंबरला पार पडणार आहे.

Ankush Dhavre

IPL 2025 Mega Auction: आयपीएल २०२५ स्पर्धेचे मेगा ऑक्शन येत्या २४ आणि २५ नोव्हेंबरला पार पडणार आहे. हे ऑक्शन सुरू व्हायला एक आठवड्याहूनही कमी वेळ शिल्लक आहे. काही दिवसांपूर्वीच या ऑक्शनसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण ५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. ज्यात २०८ परदेशी आणि ३६६ भारतीय खेळाडूंधा समावेश असणार आहे.

या ऑक्शनमध्ये एकूण २०४ खेळाडूंना संघात घेतलं जाईल. ज्यात ७० परदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे. एकूण ८१ खेळाडूंची बेस प्राईज २ कोटी ठेवण्यात आली आहे. दरम्यान कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे? जाणून घ्या.

राजस्थान रॉयल्स :

राजस्थान रॉयल्सने एकूण ६ खेळाडूंना रिटेन केलं आहे. या ६ खेळाडूंना रिटेन करण्यासाठी त्यांनी ७९ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे ४१ कोटी रक्कम शिल्लक आहे.

सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादने आगामी हंगामासाठी ५ खेळाडूंना रिटेन केलं आहे. या खेळाडूंना रिटेन करण्यासाठी त्यांनी ७५ कोटी खर्च केले आहेत. या संघाकडे ४५ कोटी रुपये शिल्लक आहेत.

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सने देखील आगामी हंगामासाठी ७५ कोटी खर्च करत ५ खेळाडूंना रिटेन केलं आहे. त्यामुळे ऑक्शनसाठी त्यांच्याकडे ४५ कोटी रुपये शिल्लक आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्सने ६ खेळाडूंना रिटेन करण्यासाठी ६९ रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ५१ कोटी शिल्लक आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज

चेन्नई सुपर किंग्जने ६५ कोटी खर्च करत ५ खेळाडूंना रिटेन केलं आहे. आगामी ऑक्शनपूर्वी या संघाकडे ५५ कोटी शिल्लक आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स

लखनऊने ५१ कोटी मोजत ५ खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवलं आहे. आगामी हंगामापूर्वी या संघाकडे ६९ कोटी रक्कम शिल्लक आहे.

गुजरात टायटन्स

गुजरातने देखील ५१ कोटी मोजत ५ खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवलं आहे. आगामी हंगामापूर्वी या संघाकडे ६९ कोटी रक्कम शिल्लक आहे.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्लीने ४३.७५ कोटी मोजत ४ खेळाडूंना रिटेन केलं आहे. मेगा ऑक्शनसाठी या संघाकडे ७६.२५ कोटी रुपये रक्कम शिल्लक आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ खेळाडूंना रिटेन करण्यासाठी ३७ कोटी रुपये खर्च केले आहेत. आगामी हंगामापूर्वी या संघाकडे ८३ कोटी शिल्लक आहेत.

पंजाब किंग्ज

पंजाबने ९.५ कोटी मोजत केवळ २ खेळाडूंना रिटेन केलं आहे. या संघाकडे सर्वाधिक ११०.५ कोटी रक्कम शिल्लक आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Threat Call: धक्कादायक! नांदेड बस स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी

दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकांना मदतीचा हात; IPF MahaHelpline च्या पुढाकारातून ५०० जण मायदेशी सुखरूप परतले

मुख्यमंत्र्यांसमोर 130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळा केला पोलिसांच्या स्वाधीन

आधी इराणचा गेम, आता 'या' देशांवर नेम, ट्रम्प यांचा नवा 'गेम प्लॅन' उघड

इराणच्या आडून अमेरिकेचा चीनवर हल्ला? चीनला ठेचण्यासाठी 'इराण' युद्धभुमी

SCROLL FOR NEXT