Rishabh Pant Video 
Sports

Rishabh Pant: अखेरच्या सामन्यात पंतचा तुफानी खेळ; शतकानंतर ऋषभचं धमाकेदार सेलिब्रेशन, Video Viral

Rishabh Pant Video: आयपीएलचा 18 वा हंगाम ऋषभ पंतसाठी खराब राहिला. त्याला कोणत्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. मात्र शेवटच्या सामन्यात पंतने वादळी फलंदाजी केली.

Bharat Jadhav

आयपीएलच्या 18 हंगामातील शेवटच्या साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आलेत. लखनौचा हा या हंगामातील शेवटचा सामना आहे. तर आरसीबीने प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलंय. त्यामुळे आरसीबी पुढे खेळत राहणार आहे. परंतु आरसीबीला टॉप 2 मध्ये राहण्यासाठी लखनौ विरुद्धचा सामना जिंकावा लागेल.

आरसीबीने हा सामना जिंकला तर त्यांना अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 संधी मिळतील. त्यामुळे आरसीबीसाठी हा सामना एका प्रकारे करो या मरो असा आहे. या शेवटच्या सामन्यात स्टार बॅट्समन ऋषभ पंतने वादळी शतक झळकावत आरसीबीचं टेन्शन वाढवलंय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शानदार खेळी करून कर्णधाराने त्याच्या संघाचे मालक संजीव गोयंका यांना खूश केले.

लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला या हंगामात साजेशी कामगिरी करता आली नाहीये. त्यामुळे लखनौला प्लेऑफमध्येही पोहचता आलं नाहीये. आता लखनौ शेवटच्या सामन्यात आरसीबीला पराभूत करत मोहिमेचा शेवट विजयाने गोट करण्याचा प्रयत्न करेल. याची झलक पंतने शतक ठोकत आरसीबीची धाकधूक वाढवली. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे आणि सर्वात जलद शतक ठोकले. शतक केल्यानंतर त्याने सर्कसप्रमाणे स्टंट केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

कर्णधार ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक पूर्ण केलं. आरसीबीविरुद्ध खेळताना ऋषभ पंतने २९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर, त्याने आपले आक्रमण वाढवले ​​आणि अनेक फटके मारले आणि फक्त ५४ चेंडूत शतक पूर्ण केले.

179.31 च्या स्ट्राईक रेटने ठोकलं अर्धशतक

आरसीबीकडून सूर्यश शर्मा याने लखनौच्या डावातील 10 वी ओव्हर टाकली. पंतने या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर फोर लगावला. पंतने यासह अर्धशतक पूर्ण केले. पंतने 29 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने अर्धशतक ठोकलं. पंतने 179.31 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. पंतचे 18 व्या मोसमातील दुसरं तर आयपीएल कारकीर्दीतील 20 वं अर्धशतक होतं. पंतने यासह नितीश राणाच्या विक्रमाची बरोबरी केली.

ऋषभ पंतने अर्धशतकासह लखनौसाठी मिचेल मार्श याच्यासह दुसर्‍या विकेटसाठी नाबाद शंभर धावांची भागीदारी केली. आरसीबीने टॉस जिंकत लखनौला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. सुरुवातीला लखनौला झटका मॅथ्यू ब्रीट्झकेच्या रुपाने मिळाला. तो 14 धावा करून बाद झाला. त्यानंतर पंतने मिचेल मार्शला साथ दिली. या दोघांनी लखनौचा डाव सावरला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत नाबाद शतकी भागदारी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

SCROLL FOR NEXT