Bishnoi-Badoni Catch Video Social
Sports

IPL 2025 LSG vs PBKS: अप्रतिम! बिश्नोई-बदोनीच्या जोडीची कमाल,बाउंड्रीवर टिपला उत्कृष्ट झेल|Video Viral

Bishnoi-Badoni Catch Video: सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात रवी बिश्नोईने एक शानदार कॅच घेतला. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

Bharat Jadhav

इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्सशी झाला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या. मात्र लखनऊनं दिलेलं दिलेलं आव्हान पंजाबच्या फलंदाजांनी स्फोटक फलंदाजी करत १६ व्या षटकात पार केलं. पंजाब संघाचा युवा फलंदाज प्रभसिमरन सिंगने शानदार फलंदाजी केली. पण एक मोठा फटका मारताना प्रभसिमरन झेल बाद झाला. त्याच्या विकेटचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय.

‘कॅच ऑफ द आयपीएल’

लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात रवी बिश्नोईने एक शानदार कॅच घेतला. हा कॅच पंजाबकडून फटकेबाजी करणाऱ्या प्रभसिमरनचा होता. बाउंड्रीवर रवी बिश्नोई आणि बदोनीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवला. रवी बिश्नोईने घेतला कॅच हा ' कॅच ऑफ द आयपीएल' मध्ये गणला गेला.

दिग्वेश राठी षटक टाकत होता, त्याने टाकलेल्या एका चेंडूवर प्रभसिमरन सिंगने ऑफ साईडवर एक शानदार शॉट मारला. षटकार जाणार असं प्रत्येकाला वाटत होतं, परंतु आयुष बदोनी हवेत उडी मारून बाउंड्री पार जाणारा चेंडूला रोखलं. हवेतच चेंडूला मैदानाच्या आत फेकलं आणि कॅच घेण्याचा प्रयत्न केला.

परंतु चेंडू जास्त दूर फेकल्या गेल्याने तो कॅच करू शकला नाही. त्याच दरम्यान बिश्नोईही बाउंड्रीवर पोहोचला होता. बदोनीने मैदानात परत फेकलेला चेंडू पाहून रवी बिष्णोईने हवेत उडी मारत झेल पकडला. त्या दोघांचं क्षेत्ररक्षण आणि झेल पाहून सगळेच अवाक् झाले. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

निकोलस पूरन आणि आयुष बदोनी यांच्या शानदार खेळीमुळे लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सविरुद्ध १७१ धावा केल्या. लखनऊ संघाचा ढासळलेला डाव दोन्ही फलंदाजांनी सावरला. पूरनने ४४ आणि बदोनीने ४१ धावा केल्या. बदोनीने अब्दुल समदसोबत सहाव्या विकेटसाठी २१ चेंडूत ४७ धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या १७० च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पंजाब किंग्सकडून अर्शदीप सिंग हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ४३ धावा देत ३ बळी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT