LSG VS MI  x
Sports

LSG VS MI : लखनऊशी भिडण्याआधीच मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं; आयपीएलमध्ये कसा आहे रेकॉर्ड?

LSG VS MI IPL 2025 : एकाना स्टेडियमममध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधीच मुंबई इंडियन्सचे टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

LSG VS MI IPL 2025 News : लखनऊ सुपर जायंट्स आज घरच्या स्टेडियममध्ये सामना खेळणार आहे. एकना स्टेडियममध्ये आज लखनऊ विरुद्ध मुंबई हा सामना रंगणार आहे. मुंबई आणि लखनऊ या दोन्ही संघांचा आयपीएल २०२५ मध्ये दोनदा पराभव झाला आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्हीही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

हेड-टू-हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासामध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ सहा वेळा आमने सामने आले आहेत. त्यातील ५ सामन्यांमध्ये लखनऊचा विजय झाला आहे. फक्त १ सामना मुंबई इंडियन्सने जिंकला आहे. या रेकॉर्डवरुन लखनऊचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय आजचा सामना लखनऊच्या घरच्या स्टेडियममध्ये होणार असल्याचा फायदा देखील सुपर जायंट्सना होणार आहे.

लखनऊने आयपीएल २०२५ मध्ये आत्तापर्यंत ३ सामने खेळले आहेत. यातील हैदराबादच्या सामन्यामध्ये लखनऊचा विजय झाला होता. दिल्ली आणि पंजाब विरुद्धच्या सामन्यामध्ये लखनऊचा दारुण पराभव झाला होता. तिन्हीही सामन्यांमध्ये लखनऊचा कर्णधार रिषभ पंतने खराब कामगिरी केली होती. आजच्या सामन्यात पंत फेल होतोय की पास याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दुसऱ्या बाजूला मुंबईने देखील ३ सामने खेळले आहेत. चेन्नई आणि गुजरातसमोर मुंबईचा संघ ढेपाळला. पण केकेआर विरुद्धच्या सामन्यात मुंबईने कमबॅक केले. ज्याप्रमाणे लखनऊसाठी पंतचा खराब फॉर्म डोकेदुखी ठरला आहे. त्याचप्रमाणे हिटमॅन रोहित शर्माचा खराब फॉर्ममुळे मुंबई इंडियन्ससाठी त्रासदायक ठरत आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये रोहित लवकर माघारी परतला होता. तिसऱ्या सामन्यात त्याने काहीशी समाधानकारक कामगिरी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT