Rishabh Pant X
Sports

एका धावेची किंमत २४ लाख; पण सामन्यात असं काही होतंय की शेवटी रिषभचा खिसा रिकामाच, प्रकरण काय?

MI VS LSG IPL 2025 : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यामध्ये स्लो ओव्हर रेटमुळे रिषभ पंतवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून २४ लाख रुपये दंड म्हणून आकारले गेले आहेत.

Yash Shirke

IPL 2025 मध्ये, एकीकडे रिषभ पंत एक धाव घेतल्यानंतर २४.५० लाख रुपये कमावत आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या खिशातून २४ लाख रुपये गेले आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यानंतर पंतवर कारवाई करण्यात आली आहे. त्याला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई विरुद्ध खेळताना स्लो ओव्हर रेटमुळे लखनऊच्या कर्णधाराला दोषी ठरवण्यात आले आहे.

सामान्यत: जेव्हा स्लो ओव्हर रेटची स्थिती असते, तेव्हा १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. पण स्लो ओव्हर रेटची चूक दोनदा केल्याने रिषभ पंतकडून दुप्पट म्हणजेच २४ लाख रुपये आकारले जाणार आहेत. स्लो ओव्हर रेटमुळे रिषभ पंत व्यतिरिक्त आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टअंतर्गत, लखनऊ सुपर जायंट्सच्या संघातील काही खेळाडूंकडून ६ लाख रुपये किंवा मानधनापैकी २५ टक्के रक्कम आकारली जाणार आहे.

४ एप्रिल रोजी जेव्हा मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ पहिल्यांदा आयपीएल २०२५ मध्ये आमनेसामने आले होते. तेव्हा स्लो ओव्हर रेटमुळे रिषभ पंतवर कारवाई करण्यात आली होती. योगायोगाने लखनऊ विरुद्ध मुंबईच्या सामन्यामध्येच पुन्हा एकदा रिषभ पंतकडून तीच चूक पुन्हा एकदा झाली आहे.

रिषभ पंत हा आयपीएल २०२५ मधला सर्वात महागडा खेळाडू आहे. २७ कोटी रुपये खर्च करुन रिषभ पंतला लखनऊच्या त्यांच्या ताफ्यात सामील केले होते. तेव्हा पंत लखनऊकडून खेळताना दमदार कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात होती. पण पंतने सर्वांना निराश केल्याचे पाहायला मिळते. त्याने १० सामन्यांमध्ये १२.२२ च्या सरासरीने आणि १०० पेक्षा कमी स्ट्राईक रेटने फक्त ११० धावा केल्या आहे. याचा अर्थ, त्याने काढलेल्या प्रत्येक धावेची किंमत २४.५ लाख रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

अजित पवार विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलावर अपघातमुळे मोठी वाहतूक कोंडी

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांची मोठी मागणी

Bhiwandi Crime: उपमुख्यमंत्र्यांची भेट करून देतो म्हणून लॉजवर नेलं; सेना कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT