मुंबई : आयपीएल २०२५ मधील ३३वा सामना काल मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये पलटणने ४ विकेट्सने पराभव करत पाहुण्या संघाला धूळ चारली. मुंबई संघाने आपला तिसरा विजय साकारत तगड्या हैदराबाद संघाला घरच्या मैदानावर सरशी साधू दिली नाही. या सामन्यानंतर मुंबईच्या मालक नीता अंबानी आणि सनरायजर्स संघाचा खेळाडू इशान किशन यांचा एक एकत्रित फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. इशान आधी मुंबईकडून सलामीला यायचा मात्र गेल्या लिलावामध्ये त्याला मुंबईनं रीलीज केलं होतं. इशानला टीममधून जरी काढलं असलं तरी त्याचा नीता अंबानींच्या मनात जागा असल्याचं पाहायला मिळालं.
इशान किशन मुंबईच्याविरूद्धच्या सामन्यात फार काही मोठी कामगिरी करू शकला नाही. हैदराबाद संघाला ज्यावेळी मोठ्या फटकेबाजीची गरज होती, त्याचवेळी त्याने नांगी टाकली, अवघ्या दोन धावा करून तो माघारी परतला. इशान किशन हा मुंबईकडून गेले सात सीझन खेळला होता. सामना संपल्यानंतर नीता अंबानी यांना भेटला तेव्हा तो काहीसा निराश दिसला. इशानने त्यांना नमस्कार केल्यावर नीता अंबानींही त्याच्यासोबत प्रेमाने बोलत त्याच्या गालावर थाप दिली. त्यानंतर इशान हसतमुखाने गेला. दोघांच्या भेटीचा व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
हैदराबादने दिलेले १६३ धावांचं लक्ष्य मुंबईला दिलं होतं. रोहित शर्माने चाचपडत सुरुवात केली. त्याने तीन षटकार लगावले, पण तो पुन्हा एकदा मोठी खेळी करू शकला नाही. रायन रिकेल्टनला जीवदान मिळाले. मात्र, त्यालाही चांगल्या सुरुवातीचे रूपांतर चांगल्या खेळीत करता आले नाही. यानंतर विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादवने २९ चेंडूंत ५२ धावांची भागीदारी रचली. ही जोडी विजय मिळवून देणार, असे वाटत होते. मात्र, पॅट कमिन्सने सलगच्या षटकात या दोघांना माघारी पाठविले. मुंबईला अखेरच्या ३० चेंडूंत २६ धावांची गरज होती. यात हार्दिक पंड्याने फटकेबाजी करून हैदराबादला संघर्षाची संधीच दिली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.