Hardik Pandya Throw Video 
Sports

Video: धावांची चोरी तेही पांड्यासमोर Impossible! हार्दिकच्या रॉकेट थ्रोने तेवतियाच्या उडाल्या दांड्या, झाला 'डायमंड डक'चा शिकार

Hardik Pandya Throw Video: हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सविरुद्ध उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. त्याने केलेला रॉकेट थ्रोचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Bharat Jadhav

अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतील ९व्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघानं मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. यामुळे मुंबईला विजयाचे खाते उघडता आलं नाहीये. गुजरातच्या संघाने एमआयचा ३६ धावांनी पराभव केला. त्यामुळे गुजरातच्या विजयची चर्चा आहे. पण यामध्ये हार्दिकच्या क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरातने मुंबईचा दारूण पराभव केला. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरला. मुंबईच्या संघाने गुजरातला २०० धावांच्या आत रोखून ठेवलं असलं तरी त्यांना आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करता आला नाही.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाचे सलामीवीर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून ७८ धावा जोडल्या होत्या. त्यानंतर काही गुजरात संघाची पडझड झाली. पण सामन्याचा शेवट गोड करत त्यांनी मुंबईला पराभूत केलं. याचदरम्यान हार्दिक पांड्याने केलेल्या क्षेत्ररक्षणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात त्याने रॉकेटच्या वेगात स्टम्पकडे चेंडू फेकल्याचं दिसत आहे. त्याच्या थ्रोमुळे गुजरात संघाचा फलंदाज राहुल तेवतियाला एकही धाव न करता माघारी परतावे लागले.

हार्दिक पांड्याचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण

हार्दिक पांड्याने १८.१ षटकात रॉकेट थ्रोने सर्वांची मने जिंकली. त्याने राहुल तेवतियाला डायमंड डकचा शिकार केलं. तेवतिया हार्दिकच्या समोर चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न करत होता. पण पांड्याने शानदार क्षेत्ररक्षण करत स्टम्पवर थेट थ्रो केला. राहुल तेवतिया परत क्रिझवर येईपर्यंत त्याच्या दांड्या गुल झाल्या होता. तेवतिया शुन्य धावांवर बाद झाला. हार्दिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

दरम्यान हार्दिक पांड्या आयपीएल२०२५ चा पहिला सामना खेळला. CSK विरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो सामना खेळला नाही. कारण हार्दिकवर स्लो ओव्हरच्या नियमानुसार एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.

गुजरातने १९६ धावा केल्या

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने कमाल केली. साई सुदर्शनने ४१ चेंडूत ६३ धावा केल्या, तर शुभमन गिलने २७ चेंडूत ३८ धावा केल्या. याशिवाय जोस बटलरने २४ चेंडूत ३९ धावा केल्या. दरम्यान तीन टॉप ऑर्डर बॅट्समन व्यतिरिक्त एकाही बॅट्समनला मोठी इनिंग खेळता आली नाही. गुजरातच्या संघाने २० षटकांत ८ गडी गमावून १९६ धावा केल्या होत्या. मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने ४ षटकात २९ धावा देऊन २ बळी घेतले. तर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान यांना १-१ यश मिळाले.

अहमदाबादमध्ये सलग चौथ्यांदा गुजरातचा विजय

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई आणि गुजरातचा संघ चौथ्यांदा समोरासमोर आले.सलग चौथ्यांदा गुजरातने घरच्या मैदानावर बाजी मारली. गुजरात टायटन्सच्या संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी नांगी टाकली. एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme : एफडी सोडा... पोस्टाच्या 'या' योजनेत ५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल भरघोस व्याज

Maharashtra Live News Update: मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Yavatmal Court : प्रियकराच्या मदतीने आईने केली मुलाची हत्या; दोघांना जन्मठेपची शिक्षा

तक्रारदाराला बड्या नेत्यानं संपवलं, चारचाकीनं चिरडलं; पोलिसांनी बेड्या ठोकल्या

Samsung Galaxy F17 5G: कमी बजेटमध्ये मोठा धमाका! Samsung Galaxy F17 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

SCROLL FOR NEXT