Sports

GT vs MI: शुभमन गिलने तोडला डेविड वॉर्नरचा विक्रम, बनवला महारेकॉर्ड

Shubman Gill: शुभमन गिलने मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठा विक्रम केलाय. त्याने डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडलाय.

Bharat Jadhav

IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सचे संघ २९ मार्च रोजी आमनेसामने आहेत. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी गुजरातला चांगली सुरुवात करून दिली. गिलने या सामन्यात एक मोठा टप्पा गाठलाय. गिलने डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडीत काढलाय.

मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना शुभमन गिलने धमाकेदार फलंदाजी केली. गिलने एकाच स्टेडियमवर आयपीएलमध्ये सर्वात जलगतीने १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. असा विक्रम करणारा ख्रिस गेल पहिला खेळाडू होता. आता एकाच स्टेडियमवर १ हजार धावा करणारा शुभमन गिल दुसरा खेळाडू बनलाय. गिलने केवळ २० डावांमध्ये ही कामगिरी केली. आयपीएलमध्ये एकाच ठिकाणी सर्वात जलद १००० धावा पूर्ण करण्याचा पराक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.

बेंगळुरूच्या मैदानावर त्याने १९ डावात सर्वात जलद १००० धावा पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे, त्याने हैदराबादच्या मैदानावर २२ डावांत मोठी कामगिरी केली. तर चौथ्या नंबरवर शॉर्न मार्श आहे. त्याने मोहालीच्या मैदानावर १००० हजार धावा २६ डावात पूर्ण केल्या आहेत.

गुजरातसाठी सलामीसाठी उतरलेल्या शुभमन गिलने चांगली सुरूवात करून दिली होती. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गिलने साई सुदर्शनसोबत पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. हार्दिक पांड्याने त्याला ८.३ षटकात बाद केलं. गिलने २७ चेंडूमध्ये ३८ धावा केल्या. यात ४ चौकारासह १ षटकाराचा समावेश आहे. गिल बाद झाल्यानंतर जोस बटलर मैदानात आला. त्याने सुदर्शनच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावा जोडल्या. जोस बटलरने २४ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३९ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आभाळाएवढं दु:ख बाजूला ठेवून शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर; नीरा नदीच्या काठावर केली दूषित पाण्याची पाहणी|VIDEO

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

Saturday Horoscope: जोडीदारासोबत दिवस उत्तम, 5 राशींच्या व्यक्तींना पैशांची चणचण; वाचा शनिवारचे राशीभविष्य

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्र अव्वल; गणेशोत्सव चित्ररथाने मिळवला सर्वोच्च बहुमान

SCROLL FOR NEXT