IPl 2025 GT vs MI Rohit Sharma 
Sports

Rohit Sharma Record: एक चौकार मारताच रोहित शर्माच्या नावावर होणार मोठा विक्रम; विराट-वॉर्नरच्या क्लबमध्ये होईल एंट्री

IPl 2025 GT vs MI Rohit Sharma: रोहित शर्माजवळ एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम करू शकतो.

Bharat Jadhav

पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या सत्रातील दुसरा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियवर या दोन्ही संघातील सामना रंगणार आहे. दोन्ही संघ विजयाच्या शोधात आहेत. मुंबई आणि गुजरातला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

मुंबईचे चाहत्यांची नजर रोहितच्या खेळावर असणार आहे. कारण या सामन्यात मोठी कामगिरी करण्यापासून तो केवळ चौकार दूर आहे. चौकार मारताच रोहितच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला जाणार आहे.

रोहित शर्माकडे विक्रम करण्याची मोठी संधी

आयपीएलच्या इतिहासात तीन फलंदाज असे झालेत त्यांनी आपल्या करिअरमध्ये ६०० किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारलेत. आता या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माचाही समावेश होणार आहे. आयपीएलमध्ये ६०० चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचे नाव नोंदवले जाणार आहे. रोहित शर्माने आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात ५९९ चौकार मारलेत.

एक चौकार मारताच रोहित आयपीएलमधील सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पोहोचणार आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात रोहितने चौकार मारल्यास तो शिखर धवन, विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या खास क्लबमध्ये आपले स्थान निर्माण करेल.

आयपीएल २०२४ नंतर निवृत्त झालेल्या शिखर धवनच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम आहे. त्याने २२२ सामन्यात ७६८ चौकार मारले आहेत. दुसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे, त्याने २५८ सामन्यात ७११ चौकार मारले आहेत. या यादीत तिसरं नाव डेविड वॉर्नरच आहे, त्याने १८४ सामन्यात ६६३ चौकार मारलेत.

गुजरातच्या संघाची संभाव्य प्लेईंग ११

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, शेरफेन रदरफोर्ड/ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, आर साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग ११

रोहित शर्मा, रेयान रिकलटन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, मिचेल सैंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, एस राजू, विग्नेश पुथुर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT