IPL 2025 GT vs MI Saam Tv
Sports

GT vs MI: गुजरात टायटन्सचे 'पांडव' मुंबई इंडियन्सला देतील कडवं आव्हान; MIला दाखवू शकतात 'आस्मान'

IPL 2025 GT vs MI : इंडियन प्रीमियअर लीग २०२५ चा ९ वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सच्या दरम्यान होत आहे. अहमदबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये या दोन्ही संघात सामना रंगणार आहे.

Bharat Jadhav

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघाची आयपीएल २०२५मधील सुरुवात निराशाजनक राहिलीय. दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. दोन्ही संघांना विजयाची अपेक्षा असल्यानं दोन्ही संघ एकमेंकांना कडवी झुंज देतील, त्यामुळे हा सामना अधिक रोमांचकारी ठरणार आहे.

पंजाब किंग्सकडून गुजरातला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे पराभवाची जखम मुंबईला हरवून मिटवण्याचा प्रयत्न गुजरातचा संघ करेल. दुसरीकडे विजयाचं खातं उघडण्यासाठी मुंबईही दमदार खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल. मुंबई इंडियन्स संघाला आपल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न करेल.

हार्दिक पांड्याची मुंबईच्या संघात पुनरागमन झाले आहे, त्यामुळे मुंबईच्या संघाची ताकद वाढलीय. पंरतु गुजरातच्या संघातील पाच खेळाडूंनी आपली कमाल दाखवली तर ते मुंबईला पाणी पाजू शकतील. कोण आहेत गुजरातचे पांडव जे मुंबईला पराभूत करण्याची हिम्मत ठेवतात? हे जाणून घेऊ.

जोस बटलर

गुजरात टायटन्सचा अनुभवी यष्टीरक्षक आणि फलंदाज जोस बटलर मुंबईसाठी कर्दनकाळ ठरू शकतो. बटलरने पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्धात अर्धशतक केलं होतं.

शुभमन गिल

गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि स्टार फलंदाज शुभमन गिलही मुंबईसाठी आव्हान देणारा ठरेल. पंजाब संघाच्या विरुद्धात त्याने १४ चेंडूंमध्ये ३३ धावा काढल्या होत्या. या सामन्यात मोठी खेळी तो करू शकला नसला तरी तो मु्ंबईविरुद्ध मोठी खेळी करू शकतो.

साई सुदर्शन

गुजरात टायटन्सचा युवा सलामीवीर साई सुदर्शन हा फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यात त्याने ५ चौकार ६ षटकार मारत त्याने ४१ चेंडूंमध्ये ७४ धावा केल्या आहेत.

मोहम्मद सिराज

भारतीय जलद गतीचा गोलंदाज मोहम्मद सिराजला गुजरातने १२.२५ कोटी रुपयांत खरेदी केलंय. सिराजसाठी पहिला सामना चांगला राहिला नव्हता. परंतु आपल्या भेदक गोलंदाजीने तो मुंबईचे धाबे दणाणून सोडू शकतो. सिराजने आपल्या आयपीएल करिअरमध्ये ९३ विकेट घेतल्या आहेत.

कागिसो रबाडा

दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. रबाडा आपल्या गोलंदाजीने मुंबईच्या फलंदाजांना कमी धावसंख्येत रोखून ठेवू शकतो. रबाडाने ११८ विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT