IPL 2025 मधला ५२ वा सामना काल चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये खेळला गेला. टॉस जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी केली. बंगळुरूच्या शिलेदारांनी २० ओव्हर्समध्ये २१३ धावा केल्या. २१४ धावांचे लक्ष्य गाठताना सीएसकेच्या फलंदाजांनी फक्त २११ धावा केल्या. यश दयालने शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला रोखत बंगळुरूचा विजय निश्चित केला. या सामन्यादरम्यान डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटची चर्चा पाहायला मिळाली.
२१४ धावांचे आव्हान गाठत असताना पंधराव्या ओव्हरपर्यंत चेन्नईने १७२ धावा केल्या होत्या. सोळाव्या ओव्हरमध्ये लुंगी एनगिडी गोलंदाजी करायला आला. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर आयुष म्हात्रे कॅचआउट झाला. त्यानंतर क्रीजवर डेवॉल्ड ब्रेव्हिस उतरला. तिसऱ्या चेंडूवर डेवॉल्ट ब्रेव्हिस बाद झाला. लुंगी एनगिडीने टाकलेला चेंडू ब्रेव्हिसच्या पॅडवर लागला आणि त्याने लगेच अपील केले. अंपायर्सनी बोट वर करत LBW आउटची घोषणा केली. अंपायरकडे दुर्लक्ष करत ब्रेव्हिस धावा काढत बसला.
आउट कॉल दिल्यानंतर जडेजा आणि ब्रेव्हिस यांनी चर्चा केली. ते दोघे रिव्ह्यू घेण्यासाठी अंपायरकडे गेले. १५ सेकंदांचा कालावधी संपल्याने डीआरएसची विनंती नाकारण्यात आली. डीआरएस टायमर मोठ्या स्क्रीनवर न दाखवल्याने त्याकडे लक्ष गेले नाही असा दावा जडेजाने केला. पुढे नाईलाजाने ब्रेव्हिसला माघारी परतावे लागले. रिप्लेमध्ये चेंडू स्टंपच्या बाहेर होता असे दिसले. जर वेळीच ब्रेव्हिस किंवा जडेजाने डीआरएस घेतला असता, तर ब्रेव्हिसला शून्यावर परतावे लागले नसते.
डीआरएस टायमर न दाखवल्याने आणि आउट कॉल दिल्याने चेन्नईचे चाहते अंपायर्सवर भडकल्याचे चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळाले. या प्रकरणावर माजी अंपायर अनिल चौधरी यांनी स्पष्टीकरण दिले. 'डीआरएस टायमर स्क्रीनवर न दाखवणे ही मोठी चूक आहे. आउटचा कॉल दिल्यानंतरही धावा काढणे हे त्यापेक्षाही मोठी चूक आहे. आउट झाल्यानंतर तो डेड बॉल ठरतो. डीआरएससाठी उरलेल्या ५ सेकंंदांवर अंपायर खेळाडूंना सूचना देत असतात. या ठिकाणी अंपायर्सची चूक नव्हती. स्क्रीनवर टायमर न दाखवणाऱ्या ऑपरेटरची खरी चूक आहे,' असे वक्तव्य अनिल चौधरी यांनी केले.
डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटनंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी फलंदाजीसाठी आला. गरज असताना धोनीने षटकार-चौकार असे शॉट मारणे टाळले. तो ८ चेंडूंमध्ये १२ धावा करुन माघारी परतला. शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीची विकेट पडल्यानंतर शिवम दुबे फलंदाजीसाठी आला. पहिल्याच चेंडूवर त्याने दमदार षटकार मारला. पण त्यानंतर त्याला चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही. तो जर धोनीच्या आधी फलंदाजीला आला असता, तर चेन्नईला फायदा झाला असला असे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.