Virat Kohli Twitter
क्रीडा

RR VS RCB: अरे देवा! IPl मध्ये ८ वं शतक ठोकल्यानंतरही विराटच्या नावावर झाला नकोसा विक्रम

Bharat Jadhav

IPL 2024 Virat Kohli Slow Run Century Record:

आयपीएल २०२४ च्या १९ व्या सामन्यात विराट कोहलीने धमाकेदार खेळत करत शतक ठोकलं. राजस्थान रॉयल्सविरुद्धात खेळताना विराट कोहलीने आयपीएल करिअरमधील ८ वं शतक केलं. कोहली सलामीपासून ते डावसंपेर्यंत मैदानावर उभा होता. त्याने ७२ चेंडूंचा सामना करत ११३ धावांची नाबाद खेळी केली. यात १२ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. इतकी जबरदस्त खेळी करूनही विराटच्या नावावर नकोसा विक्रम झालाय. (Latest News)

विराटचा विक्रम

विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक ७ शतकं झळकावणारा खेळाडू होता. आज कोहलीने ८ वं शतक केलं आहे. विराट कोहलीनंतर क्रिस गेलने आयपीएलमध्ये ६ आणि जॉस बटलरने ५ शतकं झळकावली आहेत. तर टी२० मधील त्याचं हे ९वं शतक आहे. विराट कोहलीने ८-८ शतक करणारे एरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर, मायकेल क्लिंगर यांना पिछाडलं आहे. टी२० मध्ये सर्वाधिक शतक क्रिस गेलने केले आहेत. त्यानंतर बाबर आझमचा क्रमांक लागतो.

  • क्रिस गेल -२२

  • बाबर आझम- ११

  • विराट कोहली -९

  • डेव्हिड वॉर्नर -८

  • एरॉन फिंच -८

  • मायकेल क्लिंगर-८

विराटच्या नावावर नकोसा विक्रम

आजच्या सामन्यात विराट कोहलीने एक शानदार खेळी केली. पण त्याचवेळी त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला. कोहली सर्वात संथ गतीने आयपीएलमध्ये शतक करणारा फलंदाज बनलाय. या रिकॉर्ड याआधी मनीष पांडे याच्या नावावर होता. त्याने २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सच्या विरुद्धात ६७ चेंडूमध्ये शतक केलं होतं.

आजच्या डावात कोहलीने ६७ चेंडूमध्ये शतक पूर्ण केलं. विराट आणि मनीषशिवाय या नकोशा विक्रमाच्या यादीत सचिन तेंडुलकर, जॉस बटलर, आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावाचा समावेश आहे. यांनी ६६-६६ चेंडूमध्ये शतक केलं होतं.

आयपीएल इतिहासातील सर्वात संथ शतक

  • मनीष पांडे – ६७ चेंडू, विरुद्ध डेक्कन चार्जर्स ( २००९)

  • विराट कोहली – ६७ चेंडू, विरुद्ध राजस्थान रॉयल्स (२०२४)

  • सचिन तेंडुलकर – ६६चेंडू, विरुद्ध कोची टस्कर्स ( २०११)

  • डेव्हिड वॉर्नर - ६६ चेंडू, विरुद्ध केकेआर ( २०१०)

  • जॉस बटलर – ६६ चेंडू, विरुद्ध मुंबई इंडियन्स (२०२२)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

SCROLL FOR NEXT