IPL 2024 Update Why did Mumbai Indians replace Rohit Sharma and make Hardik Pandya captain know real reason Saam TV
Sports

Mumbai Indians Captain: मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला कर्णधार का बनवलं? अखेर उत्तर सापडलंच...

Mumbai Indians News: रोहितसारखा चाणाक्ष कर्णधार असताना मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला कर्णधार का बनवलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Satish Daud

Mumbai Indians New Captain

आयपीएल २०२४ स्पर्धेआधी क्रीडा विश्वात एक मोठी घडामोड घडली. पाचवेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या संघात मोठा बदल केला. मुंबईने रोहित शर्माच्या हातून कर्णधारपदाची सूत्रे काढून घेत हार्दिक पंड्याकडे दिली. या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले आहेत.

रोहितसारखा चाणाक्ष कर्णधार असताना संघ व्यवस्थापनाने हा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रीडाप्रेमी याबाबतचा सवाल उपस्थित करीत आहेत. अखेर रोहितच्या चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढलं?

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरून का काढलं? यामागची अनेक कारणं आहेत. रोहित बऱ्याच काळापासून भारतासाठी टी-२० सामने खेळताना दिसत नाही. मागच्या आयपीएल हंगामानंतर त्याने टीम इंडियासाठी एकही सामना खेळला नाही.

त्यामुळे रोहित जर भारताकडून टी-२० क्रिकेट खेळत नसेल, तर त्याला आपल्या संघाचे कर्णधारपद कसे द्यायचे, असा विचार मुंबईने केला असेल. दुसरं कारण म्हणजे, रोहितने मुंबई इंडियन्सला ५ वेळा चॅम्पियन बनवलं खरं, पण गेल्या तीन वर्षात मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच खराब राहिली आहे.

त्यामुळे संघाच्या नेतृत्वात बदल हवा, असे मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) वाटले असावं. तिसरं कारण म्हणजे गेल्या तीन वर्षात क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्माला सातत्याने अपयश येत आहे.

त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकपचा फायनल सामना गमावला आहे. त्यामुळे सतत अपयशी होणाऱ्या कर्णधाराला आपल्या टीमचा कर्णधारपदी का ठेवायचं? असा विचार मुंबई इंडियन्सच्या संघाने केला असावा.

मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला कर्णधार का बनवलं?

हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा अष्टपैलू खेळाडू असून धोनीसारखा चाणाक्ष कर्णधार आहे. आयपीएलच्या सलग दोन हंगामात त्याने गुजरात टायटन्सला फायनलमध्ये पोहचवलं आहे. तो भारतीय संघाचा टी-२० कर्णधार देखील असून येणाऱ्या विश्वचषकात टीम इंडियाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा नवा कर्णधार आपल्या संघात असावा, असं मुंबई इंडियन्सला वाटलं असावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT