RCB Vs KKR, Knight riders Won by 7 wickets SAAM TV
क्रीडा

RCB Vs KKR : नारायण...नारायण... 'विराट' खेळी व्यर्थ; बेंगळुरूच्या चुका भोवल्या, कोलकाताचा धमाकेदार विजय

Royal Challengers vs Knight riders, IPL 2024 : सुनील नारायणची तुफानी खेळी, दुखापतीशी झुंज देत व्यंकटेशनं केलेल्या झुंझार खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर सहज विजय मिळवला.

Nandkumar Joshi

Royal Challengers vs Knight riders :

सुनील नारायणची तुफानी खेळी, दुखापतीशी झुंज देत व्यंकटेशनं केलेल्या झुंझार खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर सहज विजय मिळवला. फलंदाजीत अपयशी ठरलेला फाफ डू प्लेसिस कर्णधार म्हणूनही अपयशी ठरल्याचं दिसून आलं.

एम चिन्नास्वामी मैदानात आज, शुक्रवारी कोलकाता विरुद्ध बेंगळुरू (RCB Vs KKR) सामना झाला. कोलकातानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय कोलकाताच्या पथ्यावर पडला. सलामीवीर फाफ डू प्लेसिस याला हरशित राणानं अवघ्या ८ धावांवर बाद केलं. मात्र, दुसऱ्या बाजूला विराट कोहली नडला. विराटनं (Virat Kohli) शेवटपर्यंत किल्ला लढवला. त्याला कॅमरून ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेलनं चांगली साथ दिली. या दोघांनी अनुक्रमे ३३ धावा आणि २८ धावा केल्या. मात्र हे दोघेही बाद झाल्यानंतर आलेल्या रजत पाटीदार आणि अनुज रावत यांनी घोर निराशा केली. दोघेही अनुक्रमे तीन धावा करून तंबूत परतले.

एका बाजूला विराट कोहली मैदानात टिच्चून उभा होता. त्यानं ५९ चेंडूंत ८३ धावांची तुफानी खेळी केली. यात चार षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. दिनेश कार्तिकनं त्याला अखेरच्या षटकांमध्ये चांगली साथ दिली. कार्तिकनं अवघ्या ८ चेंडूंत २० धावा ठोकल्या. त्यात तीन षटकारांचा समावेश होता. बेंगळुरूनं २० षटकांत ६ बाद १८२ धावा केल्या.

बेंगळुरूनं (RCB) दिलेलं १८३ धावांचं तगडं आव्हान घेऊन कोलकाताचे सलामीवीर मैदानात उतरले. कोलकातानं (KKR) सुनील नारायणच्या रुपानं खेळलेला डाव पथ्यावर पडला. त्यानं संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. अवघ्या २२ चेंडूंत ४७ धावांची आतषबाजी त्यानं केली. त्यात पाच उत्तुंग षटकारांचा समावेश होता. तर दोन चौकारही ठोकले. सॉल्टनं संघाच्या धावसंख्येला मीठाप्रमाणेच चव आणली. २० चेंडूंत त्यानं ३० धावांची खेळी केली. तर त्यानंतर आलेल्या व्यंकटेश अय्यरनं ३० चेंडूंत ५० धावा कुटल्या आणि कोलकाताला विजयी दिशेनं वाटचाल करून दिली.

बेंगळुरूला चुका नडल्या

बेंगळुरूनं १८३ धावांचं तगडं आव्हान कोलकातासमोर ठेवलं होतं. मात्र, बेंगळुरूचे गोलंदाज डिफेंड करण्यात अपयशी ठरले. कर्णधार म्हणून फलंदाजीच्या आघाडीवर अपयशी ठरलेला फाफ डू प्लेसिस रणनीतीच्या आघाडीवरही सपशेल फेल ठरला. क्षेत्ररक्षणाबरोबरच रणनीती ठरवण्यास तो अपयशी ठरला. नारायण आणि सॉल्ट वेगवान गोलंदाजांना चोपत असताना पॉवर प्लेमधल्या सहा षटकांपैकी एकही षटक त्यानं फिरकीपटूला दिलं नाही. त्यामुळं पॉवर प्लेमध्येच या सलामीच्या जोडीनं विजय निश्चित केला. १७ व्या षटकांतच बेंगळुरूनं लक्ष्य गाठलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT