आयपीएल २०२४ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले होते. या स्पर्धेतील फायनलचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना, कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. दरम्यान या स्पर्धेत मोठे रेकॉर्ड्स देखील पाहायला मिळाले होते. दरम्यान वर्षाच्या शेवटी जाणून घ्या, आयपीएल २०२४ स्पर्धेत बनवले गेलेले खास रेकॉर्ड्स.
आयपीएल २०२४ स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात २८७ धावांचा डोंगर उभारला गेला होता. हा या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर ठरला होता.
याच हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबादने २७७ धावा केल्या होत्या. यापूर्वी २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध खेळताना २६३ धावांचा डोंगर उभारला होता.
आता सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा रेकॉर्ड हैदराबादच्या नावावर आहे. आता हा रेकॉर्ड कोण मोडणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आयपीएल २०२४ स्पर्धे खेळताना पंजाब किंग्ज संघाने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. पंजाबने या हंगामात आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबसमोर जिंकण्यासाठी २६२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पंजाबने ८ चेंडू शिल्लक ठेवून यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं. यासह पंजाबने दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड मोडून काढला होता. दक्षिण आफ्रिकेने वेस्टइंडीजविरुद्ध खेळताना २५९ धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता.
या हंगामात एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड देखील मोडला गेला. या सामन्यात दोन्ही डावात मिळून ५३९ धावा केल्या होत्या. यापूर्वी एकाच सामन्यात इतक्या धावा कधीच झाल्या नव्हत्या.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना, सनरायझर्स हैदराबादने २० षटकअखेर २८७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने २० षटकअखेर २६२ धावा केल्या होत्या.
आयपीएल २०२४ स्पर्धेत एकूण १४ शतकं झळकावली गेली. यापूर्वी कुठल्याच हंगामात इतकी शतकं झळकावली गेली नव्हती. २०२३ मध्ये १२, २०२२ मध्ये ८ ,२०१६ मध्ये ७ आणि २००८ मध्ये ६ शतकं झळकावली गेली होती.
आयपीएल २०२४ स्पर्धा रेकॉर्ड ब्रेकिंग ठरली. कारण या हंगामात तब्बल १४ वेळेस २५० पेक्षा अधिक धावा कुटल्या गेल्या. यापूर्वी आयपीएलच्या १६ व्या हंगामात केवळ दोन वेळेस २५० पेक्षा अधिक धावा केल्या गेल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.