PBKS vs MI x ipl
Sports

PBKS vs MI: सूर्याची चमकदार खेळी; पंजाबसमोर १९३ धावांचे आव्हान

आज इंडियन प्रीमियर लीग १७ हंगामाचा ३३ वा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. हा सामना चंदीगड येथील मुल्लानपूर इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

Bharat Jadhav

Punjab Kings and Mumbai Indians IPL 2024 :

आज इंडियन प्रीमियर लीग १७ हंगामाचा ३३ वा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. हा सामना चंदीगड येथील मुल्लानपूर इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यासाठी पंजाबचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यानंतर मुंबईच्या संघाने २० षटकात ७ विकेट गमावत १९२ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी पंजाबला १९३ धावा करायच्या आहेत.

प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या ५३ चेंडूत ७८ धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने ७ बाद १९२ धावा केल्या. सूर्यकुमारने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकार मारले. सूर्याने रोहित शर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी ५७ चेंडूत ८१ धावांची आणि तिलक वर्मासोबत २८ चेंडूत ४९ धावांची भागीदारी केली. रोहितने २५ चेंडूंच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकारांसह ३६धावा केल्या. तर तिलकने १८ चेंडूंत नाबाद ३४ धावांच्या खेळीत दोन चौकार आणि तेवढेच षटकार ठोकले.

कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?

पंजाब किंग्स: जॉनी बेयरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंह, सॅम करन (कर्णधार) , लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), शशांक सिंह, हरप्रीत बराड, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह आणि कगिसो रबाडा

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टिम डेविड, मोहम्मद नबी, रोमारियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल आणि गेराल्ड कोएत्जी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझी बायको घर सोडून गेली, मी जिवंत राहणार नाही; पाण्याच्या टाकीवर चढून नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये 'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील 'या' सदस्याची एन्ट्री, कोण आहे ती?

Gk : मोठ्या प्राण्यांचे तोंड लांब का असते? कारण वाचून तुम्ही ही पडाल विचारात

Maharashtra Live News Update : मंत्री गिरीश महाजन शिक्षकांच्या आंदोलन स्थळी

SCROLL FOR NEXT