IPL 2024 Playoffs kkr vs srh head to head record kolkata knight riders vs sunrisers hyderabad amd2000 saam tv
क्रीडा

KKR vs SRH,IPL Playoff: केकेआर नव्हे तर हैदराबादलाच मिळणार फायनलचं तिकीट! चक्रावून टाकणारी आकडेवारी एकदा पाहाच

Ankush Dhavre

दरवर्षी आपल्या गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा सनरायझर्सचा संघ यावेळी आपल्या आक्रमक फलंदाजी करतोय. साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. क्वालिफायर १ च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. जो संघ जिंकेल त्याला थेट फायनलचं तिकीट मिळणार आहे. हैदराबादचा संघ तुफान फॉर्ममध्ये असला तरीही अव्वल स्थानी असलेला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ जोरदार प्रत्युत्तर देताना दिसून येऊ शकतो.

या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद हा प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला होता. मात्र शेवटी पंजाबला धूळ चारत या संघाने दुसऱ्या स्थानी झेप घेतली. २०२० नंतर या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे शानदार फॉर्ममध्ये असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने ८ व्या वेळी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाला क्वालिफायर २ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

कसा राहिलाय रेकॉर्ड?

हैदराबाद आणि कोलकाताचा संघ प्लेऑफमध्ये ३ वेळेस आमनेसामने आला आहे. दरम्यान २ वेळेस हे संघ एलोमिनेटर तर १ वेळेस क्वालिफायर २ मध्ये आमनेसामने आले आहेत. २०१६ मध्ये झालेल्या सामन्यात हैदराबादने कोलकातावर विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा कोलकाताने बाजी मारली. तर तिसऱ्यांदा कोलकाताला पराभवाचा सामना करावा लागला. (KKR vs SRH Head to Head Record)

हैदराबादचा प्लेऑफमधील रेकॉर्ड पाहिला तर, या संघाने ११ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला ५ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर ६ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे आता कोलकाता नाईट रायडर्स संघ आपल्या पराभवाचा बदला घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral News: दिल्ली मेट्रोत चाललंय तरी काय? अश्लील डान्सनंतर आता रंगला पत्त्यांच्या डाव; VIDEO पाहून अनेकांचा संताप

Assembly Election 2024: राजकीय सभांचा डबल धमाका! PM मोदींची ठाण्यात तर राहुल गांधींची कोल्हापुरात 'तोफ' धडाडणार; वाचा सविस्तर..

Amravati News : अमरावतीत मध्यरात्री मोठा तणाव, संतप्त जमावाने पोलीस स्टेशन फोडलं; दगडफेकीत २९ पोलीस जखमी

Rain Alert : आजपासून या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Horoscope Today : नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल, जोडीदाराची भेट होईल, आज तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT