PBKS Vs MI Playing 11  saam tv
Sports

PBKS Vs MI Playing 11 : शिखर धवनशिवाय पंजाबचा संघ मैदानात उतरणार, आज मुंबईशी भिडणार; कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?

PBKS Vs MI Playing 11 Prediction update : पाँइट टेबलमध्ये पंजाब आणि मुंबई संघाकडे सारखे गुण आहेत. या दोन्ही संघांची प्लेइंग ११ कशी असेल, अशी माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

PBKS Vs MI IPL Match :

आयपीएल स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्सचा सामना होणार आहे. मल्लापूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन्ही दिग्गज संघाचा आज सायंकाळी 7.30 वाजता सामना होणार आहे. पाँइट टेबलमध्ये पंजाब आणि मुंबई संघाकडे सारखे गुण आहेत. या दोन्ही संघांची प्लेइंग ११ कशी असेल, अशी माहिती समोर आली आहे.

दोन्ही संघांनी आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामने जिंकले आहेत. तर ४ सामने गमावले आहेत. गुणातालिकेत पंजाब ८ व्या स्थानावर आहे. तर मुंबईचा ९ व्या स्थानावर आहे.

पंजाबचा कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. शिखर धवनच्या जागी आता सॅम करन संघाचं नेतृत्व करत आहे. शिखर धवनच्या अनुपस्थितीत पंजाबला विजयाचं मोठं आव्हान असणार आहे. तसेच पंजाबमध्ये सध्या शंशाक सिंह आणि आशुतोष शर्मा हे फॉर्ममध्ये आहे. (IPL)

मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघात रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघामध्ये आतापर्यंत ३१ सामने खेळण्यात आले आहेत. यात मुंबईने १६ सामने जिंकले आहेत. तर १५ सामने पंजाबने जिंकले आहेत. मागील ५ सामन्याच्या अंदाजानुसार, पंजाबचं पारडे जड आहे. मागील पाच सामन्यापैकी पंजाबने ३ सामने जिंकले आहेत.

मुंबई विरुद्ध पंजाब हेड-टु-हेड

एकूण सामने : ३१

मुंबईने किती सामने जिंकले : १६

पंजाबने किती सामने जिंकले : १५

कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?

पंजाब किंग्स: जॉनी बेयरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंह, सॅम करन (कर्णधार) , लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), शशांक सिंह, हरप्रीत बराड, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह आणि कगिसो रबाडा

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टिम डेविड, मोहम्मद नबी, रोमारियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल आणि गेराल्ड कोएत्जी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT