Sakshi Sunil Jadhav
2025 हे वर्ष मराठी, हिंदी आणि आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वासाठी शोकांत ठरले, कारण या वर्षात अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले. पुढे आपण याची संपूर्ण यादी जाणून घेणार आहोत.
मराठी आणि हिंदी नाटक आणि सिनेमात काम करणारी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज देताना 31 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले.
मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे 16 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीतला याचा मोठा धक्का बसला.
मराठीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे ज्या ‘खाष्ट सासू’च्या भूमिकांसाठी ओळखल्या जात होत्या, यांचे 3 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले.
हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री कमिनी कौशल यांचेही 13 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ योगदान दिले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर, स्वीडिश अभिनेत्री May Britt यांचे 11 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले. त्या हॉलिवूडमधील महत्त्वाच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.
ब्रिटिश अभिनेत्री Lynn Dalby यांचे 22 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या अभिनय कारकिर्दीची मोठी दखल घेण्यात आली.
याशिवाय, अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका Joan O’Brien यांचे 5 मे 2025 रोजी तर, रोमानियन अभिनेत्री Julieta Szönyi यांचे 18 एप्रिल 2025 आणि दक्षिण कोरियन अभिनेत्री Kim Sae-ron यांचे 16 फेब्रुवारी 2025 रोजी निधन झाले.
Leslie Charleson आणि Michelle Trachtenberg यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय अभिनेत्रींच्या निधनामुळे 2025 हे वर्ष चाहत्यांसाठी आणि मनोरंजन विश्वासाठी दुःखद ठरले आहे.