ipl 2024 orange and purple cap list after 1st phase virat kohli jasprit bumrah amd2000 twitter
Sports

IPL 2024 स्पर्धेचा पहिला टप्पा समाप्त! पाहा ऑरेंज - पर्पल कॅपच्या शर्यतीत असलेले टॉप ५ फलंदाज अन् गोलंदाज

IPL 2024 Orange Cap- Purple Cap List: आयपीएल २०२४ स्पर्धेचा रोमांच दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील ३५ सामने खेळले आहेत. दरम्यान या ३५ सामन्यांमध्ये अनेक मोठ मोठे रेकॉर्ड मोडले गेले आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेचा रोमांच दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील ३५ सामने खेळले आहेत. दरम्यान या ३५ सामन्यांमध्ये अनेक मोठ मोठे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. हैदराबादने याच हंगामात सर्वात मोठी सांघिक धावसंख्या उभारली. यासह एकाच डावात आणि सामन्यात सर्वाधिक चौकार आणि षटकार मारण्याचा रेकॉर्ड देखील मोडला गेला आहे. दरम्यान पहिल्या टप्प्याच्या समाप्तीनंतर कोण आहेत सर्वाधिक धावा करणारे, गडी बाद करणारे खेळाडू जाणून घ्या.

ऑरेंज कॅप..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील स्टार फलंदाज विराट कोहली या यादीत अव्वल स्थानी आहे. विराटने आतापर्यंत या स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये ७२.२० च्या सरासरीने ३६१ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या ट्रेविस हेडने ६ सामन्यांमध्ये ३२४ धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या रियान परागने ७ सामन्यांमध्ये ३१८ धावा केल्या आहेत. मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत २९७ धावा केल्या आहेत. तर केएल राहुलने २८६ धावा केल्या आहेत.

पर्पल कॅप..

पर्पल कॅपच्या यादीत मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी आहे. बुमराजने आतापर्यंत ७ सामन्यांमध्ये १३ गडी बाद केले आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या चहलने ७ सामन्यांमध्ये १२ गडी बाद केले आहेत. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्जी या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने १२ गडी बाद केले आहेत. चौथ्या स्थानी असलेल्या मुस्तफिजुर रहमानने ११ गडी बाद केले आहेत. तर पाचव्या स्थानी असलेल्या कुलदीप यादवने १० गडी बाद केले आहेत.

पहिल्या टप्प्यातील सामन्यानंतर अशी आहे गुणतालिकेची स्थिती..

१)राजस्थान रॉयल्स - १२ गुण

२) सनरायझर्स हैदराबाद - १० गुण

३) कोलकाता नाईट रायडर्स - ८ गुण

४) चेन्नई सुपर किंग्ज - ८ गुण

५) लखनऊ सुपर जायंट्स - ८ गुण

६) मुंबई इंडियन्स - ६ गुण

७) दिल्ली कॅपिटल्स - ६ गुण

८) गुजरात टायटन्स - ६ गुण

९ ) पंजाब किंग्ज - ४ गुण

१०) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २ गुण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

SCROLL FOR NEXT