IPL 2024 Saam Digital
Sports

IPL 2024 : लखनौचा २१ वर्षीय वेगवान गोलंदाज मोडणार शोएब अख्तरचा विक्रम? इतक्या स्पिडने टाकतो चेंडू

Mayank Yadav : मयांक यादवने यंदाच्या आयपीएलमध्ये डेब्यू केलं असून आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये त्याच्या गोलंदाजीने नवा विक्रम रचला आहे. या विक्रमानंतर तो शोएब अख्तरचा विक्रम मोडू शकतो का? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.

Sandeep Gawade

IPL 2024

लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुमध्ये मंगळवारी सामना रंगला होता. केएल राहुलच्या नेतृवाखाली लखनौच्या संघाने बंगळूरुचा पराभव केला. या सामन्यात क्विंटन डिकॉकने ५६ चेंडूत ८१ धावांची दमदार खेळी खेळली. अवघ्या काही धावांनी त्याचं शतक हुकलं. याचवेळी आणखी एका खेळाडूने लक्ष वेधून घेतलं. जवळपास शोएब अख्तरच्या विक्रमाच्या जवळपास पोहोचलेल्या गोलंदाजाने स्टेडियमवरील प्रेक्षकांची मने जिंकली. हा नवखा गोलंदाज आहे तरी कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. तर नाव मयांक यादव असं या वेगवान गोलंदाजाचं नाव असून त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने डेब्यू केलं आहे.

मयांक यादव या २१ वर्षीय युवा भारतीय वेगवान गोलंदाजाने आता पर्यंत दोन सामने खेळले आहेत. या सामन्यादरम्यान त्याने त्याच्या तुफानी वेगवान गोलंदाजीमुळे मैदानावर खळबळ उडवली आहे. सर्व त्याचे भरभरुन कौतुक करतांना दिसत आहेत. आयपीएल २०२४ मध्ये सलग दोनदा वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम मयांकने केला आहे. आता त्याच्या या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर तो शोएब अख्तरचा विक्रम मोडणार का? अशी शक्यता वरतवली जात आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो. मयांक हा विक्रम मोडू शकतो, पण त्यासाठी त्याला त्याची गोलंदाजी अजून वेगवान केली पाहिजे.

स्वत:चाच विक्रम मोडला

दिल्लीच्या 21 वर्षीय खेळाडू मयंक यादवचा हा पहिला आयपीएल हंगाम असून पंजाब किंग्ज विरुद्ध पहिला सामना खेळला आहे. त्या सामन्यात, जेव्हा तो १० व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा त्याने १५० किलोमीटर वेगवान चेंडू टाकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर त्याने पुढच्या षटकाचा पहिला चेंडू ताशी १५५.८ किलोमीटर वेगाने टाकला आणि स्टेडियममध्ये एकच जल्लोष पहायला मिळाला. या मोसमातील मयांक सर्वात वेगवान चेंडू ठरला. त्याने सलग १५० च्या वेगाने अनेक चेंडू टाकले होते. मयांक शोएब अख्तरचा विक्रम मोडणार की अजून कोणता नवा इतिहास रचणार याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Missing Link Project : मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार; 'मिसिंग लिंक' प्रकल्प गेम चेंजर ठरणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Maharashtra Live News Update : शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर साजरा केला जल्लोष

Singrauli News: म्हैस चक्क घराच्या छतावर चढली|VIDEO

Beed Crime : बीडमध्ये भयंकर घडलं! उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

SCROLL FOR NEXT