IPL 2024 LSG vs PBKS Playing XI Prediction Lucknow super giants vs punjab kings playing 11 news in marathi  yandex
क्रीडा

LSG vs PBKS, IPL 2024: आज केएल राहुल अन् गब्बर आमने-सामने! कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग 11?

Ankush Dhavre

PBKS vs LSG, Playing 11 Prediction:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा रोमांचक सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. लखनऊ सुपर जायंट्सच्या होमग्राउंडवर होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. दरम्यान कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

कशी असेल लखनऊ सुपरजायंट्स संघाची प्लेइंग ११?

लखनऊ सुपरजायंट्स संघाकडून केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकची जोडी मैदानावर येऊ शकते. त्यानंतर निकोलस पुरन, देवदत्त पडीक्कल आणि दीपक हुड्डासारखे फलंदाज येतील. तर कृणाल पंड्या आणि मार्कस स्टोइनिससारखे अष्टपैलू खेळाडू असतील. यासह गोलंदाजीची जबाबदारी मोहसीन खान, रवी बिष्णोई, यश ठाकूर आणि नवीन उल हक यांच्यावर असणार आहे. (Cricket news in marathi)

या ११ खेळाडूंना मिळू शकते स्थान.

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, कृणाल पंड्या, मार्कस स्टोइनिस, रवि बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान आणि यश ठाकुर.

पंजाब किंग्ज संघाबद्दल बोलायचं झालं तर, शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. यासह सिकंदर रजा, लियाम लिविंगस्टन, सॅम करन आणि जितेश शर्मासारख्या फलंदाजांना संघात स्थान दिले जाऊ शकते. तर गोलंदाज म्हणून हर्षल पटेल, कगिसो रबाडा,हरप्रीत बराड आणि राहुल चाहर गोलंदाजी करताना दिसून येऊ शकतात.

अशी असू शकते पंजाब किंग्ज संघाची प्लेइंग ११:

शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, सिकंदर रजा, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, हरप्रीत बरार, कगिसो रबाडा, हर्षल पटेल आणि राहुल चाहर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT