IPL 2024 Latest points table update after lsg vs mi match points table news in marathi amd2000 google
Sports

IPL 2024 Points Table: मुंबईचा IPL 2024 स्पर्धेतून पॅकअप? लखनऊची प्लेऑफच्या दिशेने वाटचाल; गुणतालिकेत मोठा उलटफेर

IPL 2024 Latest Points Table Update: लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर कशी आहे गुणतालिकेची स्थिती? जाणून घ्या.

Ankush Dhavre

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला ४ गडी राखून पराभव पत्करावा लागला आहे. १४४ धावांचा पाठलाग करत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून मार्कस स्टोइनिसने शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. त्याने ४५ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ६२ धावांची खेळी केली. या सामन्यातील विजयानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मोठा फायदा झाला आहे. मात्र मुंबई इंडियन्स संघाचं टेन्शन वाढलं आहे.

मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध शानदार विजय मिळवल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. या संघाचे १२ गुण असून नेट रनरेट +०.०९४ इतका आहे. तर केवळ ३ सामने जिंकू शकलेला मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. संघाचे ६ गुण असून नेट रनरेट ०.२७२ इतका आहे.

टॉप ४ मध्ये कोणते संघ?

गुणतालिकेतील टॉप ४ संघांबद्दल बोलायचं झालं, तर राजस्थान रॉयल्सचा संघ अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत १६ गुणांची कमाई केली आहे. त्यानंतर प्रत्येकी १२-१२ गुण असलेला कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा संघ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे. तर १० गुण असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.

हे ४ संघ सोडले तर पाचव्या स्थानी सनरायझर्स हैदराबाद आणि सहाव्या स्थानी दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी १०-१० गुणांची कमाई केली आहे. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्सचा संघ ८ गुणांसह सातव्या स्थानी आहे. शेवटी पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अनुक्रमे आठव्या ,नवव्या आणि दहाव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT